६८ वी राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा सन २०२४-२५ चे ०५ ते ०८ जानेवारी दरम्यान आयोजन

६८ वी राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा सन २०२४-२५ चे ०५ ते ०८ जानेवारी दरम्यान आयोजन  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव व जळगाव जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६८ वी राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन दि. ०५ ते ०८ जानेवारी, २०२५ या कालावधीत श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे करण्यात आलेले आहे.

या स्पर्धेत भारतातील २० राज्य सहभागी होत असुन १७ वर्षे आतील मुलांचे २० संघ व १७ वर्ष जातील मुलींचे १९ संघ असे एकुण ३९ संघांतील एकुण ६२४ खेळाडू, प्रत्येक संघासोबत १ व्यावस्थापक व १ फ्रीडा मार्गदर्शक असे एकूण ७८ संघ व्यावस्थापक व क्रीडा मार्गदर्शक, ४० पंच तसेच संघटनेचे पदाअधिकारी व शासकीय अधिकारी / कर्मचारी असे एकूण ९०० व्यक्तीं सहभागी होत आहेत. या स्पर्धेत भारतातील नामवंत सॉफ्टबॉल खेळाडू सहभागी होत असून या खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी जळगाव जिल्हयातील शाळा / महाविद्यालयातील विद्यार्थी / खेळाडू व जळगांवातील नागरीकांना स्पर्धेच्या माध्यमातुन उपलब्ध होणार आहे.

६८ वी राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ०५ जानेवारी रोजी सायंकाळी ०४.०० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम दि. ०८ जानेवारी रोजी सायंकाळी ०४.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. तर स्पर्धा दि. ०५ ते ०८ जानेवारी या कालावधीत सकाळी ८.०० ते संध्याकाळी ०६.०० वा. पर्यंत आयोजित करण्यात आल्या आहेत. जिल्हयातील सर्व शाळा / महाविद्यालयातील विद्यार्थी / खेळाडूं, क्रीडा संघटना, नागरीक व क्रीडा प्रेमी यांनी सॉफ्टबॉल या खेळांच्या स्पर्धा पाहण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा रविंद्र नाईक यांनी केलेले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.