आई- वडिलांचा एकुलता मुलगा, कामावर जाताना अपघातात जागीच गतप्राण झाला

 भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील छत्रपती शिवाजीमहाराज नगर मधील रहिवासी व आई- वडिलांचा एकुलता मुलगा हितेंद्र प्रकाश सोनार (३२) हा तरुण गुजरातमधील अंकलेश्वर येथे कंपनीमध्ये नोकरीस होता. कामावर जाताना १ जानेवारी रोजी त्याचा अपघातात मृत्यू झाला. नोकरीस असलेल्या या युवकाचे एमएससी पर्यंत शिक्षण झाले होते पाच-सहा वर्षांपासून तो अंकलेश्वर येथील कंपनीमध्ये नोकरीला होता. वरणगाव येथे वृद्ध आई-वडील मजुरी करून उदरनिर्वाह करीत असताना तो त्यांना अंकलेश्वर गुजरात येथे घेऊन गेला होता.

तेथेच नोकरी करुन त्या व्यतिरिक्त फावल्या वेळेत तो फर्निचरची कामे करीत होता. अशाप्रकारे रात्रंदिवस मेहनत करून त्याने तेथे घरसुद्धा घेतले होते. अडीच वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला. त्याला दीड वर्षाची मुलगी आहे. १ जानेवारी रोजी घरातून सहा वाजता नोकरीच्या ठिकाणी दुचाकीने जात असताना घरापासून काही अंतरावर मुख्य महामार्गावर त्याच्या दुचाकीला समोरून अज्ञात वाहनाने धडक दिली त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. परंतु रस्त्यावरील कोणीही त्याला मदत न केल्यामळे तो त्याच ठिकाणी दीड तासांपर्यंत पडून राहिल्यामुळे त्याच्या मेंदूतून रक्तस्त्राव होऊन तो जागीच गतप्राण झाला.त्याच्या आई- वडिलांना ही वार्ता तब्बल दीड तासांनी कळाल्यावर ते अपघातस्थळी दाखल झाले. त्याचा मृतदेह पडलेला पाहून त्यांनी हंबरडा फोडला. याचवेळी वरणगाव मूळ राहणारे महेंद्रसिंग राऊळ व त्यांचा मुलगा अमर राऊळ यांना घटना कळाल्याबरोबर ते अपघातस्थळी मदतीला धावून गेले. तोपर्यंत वेळ निघून गेली होती.घरातील एकुलता एक मुलगा तरुण वयात गेल्यामुळे आई-वडिलांसह त्याची पत्नी, लहान मुलगी, काका तसेच बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.