भावा, मी मयुरीला मारुन टाकलंय; बायकोचा जीव घेतला, नवऱ्याची फोनवर कबुली,

कराड तालुक्यातील विंग येथील मयुर कणसे याचा विवाह २०१८ मध्ये मयुरीसोबत झाला होता. मात्र त्यानंतर एकाच वर्षात त्यांच्यात वाद सुरु झाले होते.पत्नी जास्त बोलत असल्याच्या रागातून पतीनेच तिचा गळा दाबून खून केला. विंग (ता. कराड जि. सातारा) येथील विंग हॉटेल भागात नवीन वर्षाच्या मध्यरात्री ही धक्कादाय घटना घडल्याचे उघडकीस आला आहे. मयुरी मयुर कणसे (वय २७ वर्षे) असे मृत पत्नीचे नाव आहे. पती मयुर यशवंत कणसे (वय ३० वर्षे) यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याबाबत मयुरचा चुलत भाऊ विशाल सदाशिव कणसे याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याची कबुली पती मयुरने पोलिसांजवळ दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कराड तालुक्यातील विंग येथील मयुर कणसे याचे मयुरी यांच्याशी २०१८ मध्ये लग्न झाले. त्यानंतर एकाच वर्षात त्याच्यात वाद सुरू झाला. घरातील लोकांशी पटत नसल्याची मयुरीची तक्रार होती. त्यामुळे मयुरीचे नेहमीच घरातील लोकांसोबत खटके उडत होते.त्या वादामुळे ती नवऱ्याला सोडून माहेरीही गेली होती. त्यानंतर चार महिन्यापासून मयुरी व मयुर त्यांच्या मुलासह विंग हॉटेल परिसरातील फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला गेले होते. त्यांचा बेकरीचा व्यवसाय होता. मात्र, त्याच्यात वरचे वर वाद होत होते. तसा वाद ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीही सुरू होता. त्यावेळी रागाच्या भरात मयुरने पत्नीला मारहाण केली. त्या रागातच त्याने पत्नीचा गळा आवळला. त्यात मयुरीचा मृत्यू झाला.मृत्यूनंतर मयुरने त्याची सगळी हकीकत फिर्यादी विशाल कणसे यास सांगितली. विशाल कणसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काल मध्यरात्री मयुरने फोनवरून सांगितले की, त्याने मयुरीचा गळा आवळून खून केला आहे. ती खूप बोलायला लागल्याने मी तिचा गळा आळवून खून केला आहे, अशी माहिती विशालने पोलिसांना दिली.

त्यानुसार मयूरवर पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मयुरचा फोन आल्याने विशाल त्वरीत तेथे पोहोचला. त्याच्यासोबत मयुरचा भाऊ महेश कणसेही होता. त्या दोघांनाही मयुरीला आवाज देवून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिची काही हालचाल दिसत नव्हती. त्यावेळी गावातील काही जणांच्या मदतीने मयुरीला कारमधून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयुरीला डॉक्टरांनी तपासले. त्यावेळी तिचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाल्याचे जाहीर केले.या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिसांनी पती मयुर यास अटक केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.