पोलीस असल्याचे सांगून वृद्धाला अडविले; लाखोंचे दागिने घेऊन दोघे पसार

जळगाव जिल्ह्यात घरफोडी, जबरी जोरी, फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत असून आता अशातच भुसावळ तालुक्यातील दिपनगर परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे वृद्धाला रस्त्यात अडवून पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडील २ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन दोघेजण पसार झाले असून याबाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील खळवाडी परिसरात वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त कर्मचारी वसंत जगन्नाथ पाटील यांची या घटनेत लुबाडणूक झाली आहे. दरम्यान ५ डिसेंबरला वसंत पाटील व त्यांच्यासोबत एकजण असे दोघे दीपनगर बसस्थानक परिसरात गाडीने सोबत जात होते. या दरम्यान दोन अनोळखी इसमांनी त्यांची दुचाकी अडविली. यानंतर त्यांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करत इतके सोने घालून का फिरतात? म्हणून विचारणा केली.तसेच पोलीस असून तुम्हाला मी सिटी मारली; तरी तुम्ही थांबले का नाहीत. या रस्त्याने एका म्हातारीला लुटलेले असून तुम्ही एवढे सोने घालून चालले आहेत, ते सोने काढा; असे वसंत पाटील यांना सांगू लागले. यानंतर वसंत पाटील यांच्याजवळ असलेले सोने व कागदपत्रे गाडीच्या डिक्कीत ठेवून देण्याचा बहाणा करत दोघांनी हातचलाखीने २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेत दोघांनी पलायन केले. याबाबत दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर का

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.