रुग्णालयाचा गलथान कारभार समोर! डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, नातेवाईक आक्रमक.

 सातारा शहरातील मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये रुग्णालय व्यवस्थापनाच्या व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.सातारा शहरातील मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये रुग्णालय व्यवस्थापनाच्या व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान यामुळे मयत रुग्णाचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. डॉक्टरांच्या गलथान कारभारामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या चेअरमनवर व व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अक्षय अशोक नलावडे (वय २८) अस मृत तरुणाचे नाव असून तो मंगळवार पेठ येथे वास्तव्यास होता. अक्षयला २७ डिसेंबरला छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल केले होते. मंगलमूर्ती हॉस्पिटलमधील डॉ. भूषण पाटील हे त्यांच्यावर उपचार करत होते. अक्षयच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. त्यामुळे त्याला बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आज सकाळी पुन्हा त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी अक्षयवर वेळेत उपचार न केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मात्र, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधितांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत नातेवाईक आक्रमक झाले आणि रुग्णालसमोर ठिय्या मांडला.याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी मंगलमूर्ती हॉस्पिटलच्या डॉक्टरला अटक केली आहे. त्यानंतर सकाळपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेतले असले, तरी हॉस्पिटल परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.