रात्रीची वेळ, धावत्या एक्सप्रेसमध्ये सुरू होता खुनी खेळ, सकाळी प्रवासी हादरले; मध्यरात्री काय घडलं?

नागपूर रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणाची रेल्वेत हत्या करण्यात आली आहे. आधी त्याला बेदम मारहाण करण्यात आली, नंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.नागपूर रेल्वे स्थानकाआधी सुमारे ७० किलोमीटर अंतरावर सेवाग्रामजवळ एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. एका तरुणाला रेल्वेतील धावत्या रेल्वेत चार गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी बेदम मारहाण केली, या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव सुशांक राज असून, तो उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. त्याने या चौघांना मोबाईल फोन, पैसे आणि पाकीट चोरण्याला विरोध केला होता. त्यामुळे संतापून आरोपींनी सुशांकला मारहाण केली. याप्रकरणी जीआरपीने चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दक्षिण एक्सप्रेस हैदराबादहून दिल्लीला जात होती. जनरल बोगीत उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला २५ वर्षीय सुशांक रामसिंग राज देखील सिकंदराबादहून या ट्रेनच्या जनरल बोगीत बसला होता. रात्री अडीचच्या सुमारास सुशांकला झोप लागली. तो झोपला असताना त्याच्या शर्टच्या खिशातून चार आरोपींनी १७०० रूपये काढून घेतले.त्यांनतर त्याच्या खिशातून आरोपी मोबाईल काढत असताना त्याला जाग आली आणि त्याने त्या प्रवाशाकडून चोरलेला मोबाईल हिसकावला. त्यानंतर चोरांनी त्याच्याकडील पैसै चोरले असल्याचंही त्याच्या लक्षात आलं आणि त्याने त्याचे पैसै परत मागितले. तरुणाने विरोध करत आरडा ओरड करायला सुरुवात केली. त्यानंतर या चार आरोपींनी त्याला बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केलं. वेळेवर उपचार मिळू न शकल्याने त्याचा रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर जनरल बोगीत उपस्थित इतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ट्रेनमध्येच तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर ट्रेनच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एस्कॉर्टिंग टीमने नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. यानंतर रेल्वे पोलिसांनी नागपूर स्थानकावर पोहोचण्यापूर्वी जनरल डब्यातील कोणत्याही प्रवाशांना खाली उतरू दिलं नाही. ही गाडी गुरुवारी सकाळी नागपूर स्थानकावर आल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर आरोपींची ओळख पटल्यानंतर चौघांनाही ताब्यात घेण्यात आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद फैयाज, सय्यद समीर, मोहम्मद अमत आणि मोहम्मद खेसर यांचा समावेश असून ते हैदराबादचे रहिवासी असून ते अट्टल चोर आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.