दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मित्राने त्याचाच काटा काढला,घटनेमुळे सांगलीत खळबळ.

दोन भावा भावांमध्ये काही कारणांवरून सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका मित्राचाच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार, सांगली जिल्ह्यातील बाळवा तालुक्यातील पेठ येथे घडला.स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : दोन भावा भावांमध्ये काही कारणांवरून सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका मित्राचाच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार, सांगली जिल्ह्यातील बाळवा तालुक्यातील पेठ येथे घडला. सचिन सुभाष लोंढे असे खून झालेल्या युवकाचे नाव असून सचिनचा छातीत चाकू भोसकून खून झाला आहे.संग्राम शिंदे आणि शरद शिंदे या भावा भावांत भांडण सुरू असताना सचिन भांडण सोडवायला गेला असताना हा खून झाला. या खूनप्रकरणी संग्राम कमलाकर शिंदे या तरुणाला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शरद शिंदे हे दोन भाऊ पेठ येथे वास्तव्यास आहेत. या दोघांच्या शेजारीच सचिन लोंढे यांचे घर असून हे तिघे मित्र आहेत. शिंदे भावामध्ये सतत काही ना काही कारणावरुन वाद होत असत. त्यावेळी सचिन हा शरद व संग्राम यांच्यामधील भांडणात मध्यस्थी करत होता.

मंगळवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास सचिन लोंढे व त्याचे मित्र विश्वजीत शिंदे, शाकिर शिंदे, ऋषिकेश बारे हे भीमनगर परिसरात उभे होते. तेथून शरद शिंदे व संग्राम यांची बहिण मयुरी हे दोघे त्यांच्या घरी निघाले होते. त्यावेळी संग्राम शिंदे हा दुचाकीवरून हातामध्ये चाकू घेवून तेथे गेला. संग्राम व शरद यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यानंतर, दोघांत शिवीगाळी सुरू झाली. शरद व संग्राम यांच्यात जोरात भांडण सुरू झाले. त्यावेळी तेथे असलेला सचिन हा भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेला. मात्र, संग्रामने, तू आमच्या भांडणामध्ये यायचे नाही, असे म्हणून हातातील चाकू सचिनच्या छातीत खुपसला.या घावामुळे सचिन जोरजोराने ओरडला, चाकूचा घाव वर्मी लागल्याने तो खाली पडला. त्याच्या छातीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावदेखील झाला. सचिन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून संग्रामने तेथून पळ काढला. दरम्यान, तेथील मित्रांनी जखमी सचिनला इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.