माझ्या बहिणीची प्रकृती चांगली होती; प्रसूतीदरम्यान महिला व अर्भकाचा मृत्यू,

विक्रमगड तालुक्यातील गालतारे येथील या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी जव्हार उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी दाखल करण्यात आले होते. विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात ती उपचार घेत होती. परंतु येथे पुरेशा सुविधा नसल्याने तुम्ही त्यांना जव्हारच्या रुग्णालयात न्या, असे सांगण्यात आले. या महिलेची ही तिसरी प्रसूती होती. मोखाडा तालुक्याची मातामृत्यूची घटना ताजी असताना जव्हार कुटीर रुग्णालयात प्रसूतीदरम्यान एका महिलेचा व अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री घडली. तिची प्रकृती चांगली होती. तिचा अचानक तिचा मृत्यू कसा झाला, अशी विचारणा करत तिच्या कुटुंबीयांनी सखोल चौकशीची मागणी केली. कुंता वैभव पडवळे (३१) असे या मृत महिलेचे नाव आहे. विक्रमगड तालुक्यातील गालतारे येथील या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी जव्हार उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी दाखल करण्यात आले होते. विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात ती उपचार घेत होती. परंतु येथे पुरेशा सुविधा नसल्याने तुम्ही त्यांना जव्हारच्या रुग्णालयात न्या, असे सांगण्यात आले. या महिलेची ही तिसरी प्रसूती होती.

रात्री १२ वाजण्याच्या सुमारास तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या, तिला प्रसूतीगृहात दाखल करण्यात आले, यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आशीष सोनवणे यांनी तिची प्रसूती केली. मात्र काही वेळातच तिची हृदयक्रिया थांबली व तिचा मृत्यू झाला. या दरम्यान नवजात अर्भकाचाही मृत्यू झाला. ‘माझ्या बहिणीची प्रकृती चांगली होती. येथे दाखल केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत तिचा मृत्यू झाला. येथे शिकाऊ डॉक्टर भरती केले आहेत. याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी मृत महिलेचा भाऊ अंकुश अतकारी यांनी केली. रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणा ढिसाळी झाली असून आदिवासी भागात अनेक मातारुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे.
 ही महिला प्रसूतीवेळी ठीक होती. मात्र तिला अचानक हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला व प्रसूतीदरम्यानच तिचा मृत्यू झाला. आम्ही बाळाला वाचविण्याचाही खूप प्रयत्न केला. याबाबत शविच्छेदनानंतर खरे कारण कळेल, असे वैद्यकीय अधीक्षक भरत महाले यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.