झटपट पैसा कमवण्याचा नाद नडला,भामट्यांनी महिलेला लाखोंचा गंडा घातला

नागरिकांनी कोणत्याही अज्ञात व्यक्तीस आपली वैयक्तिक तसेच बँक खात्यांची माहिती देऊ नये, ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नये याकरिता पोलिसांकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र तरी देखील नागरिक लवकरात लवकर जास्त पैसे कमावण्याच्या आमिषाला भुलून ऑनलाइन फसवणुकीला बळी पडतात. ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाला बळत पडत असाल तर सावधान. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन जॉब गुंतवणुकीचे अमिष दाखवून महिलेची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची घटना बोईसर येथे घडली आहे. महिलेची तब्बल २२ लाख २६ हजार १४८ रुपये रुपये इतकी ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अज्ञात व्यक्तीस आपली वैयक्तिक तसेच बँक खात्यांची माहिती देऊ नये, ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नये याकरिता पोलिसांकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र तरी देखील नागरिक लवकरात लवकर जास्त पैसे कमावण्याच्या आमिषाला भुलून ऑनलाइन फसवणुकीला बळी पडतात. असाच ऑनलाइन फसवणुकीचा एक प्रकार पालघर तालुक्यातील बोईसर परिसरात घडला आहे.

बोईसर येथील यशवंतसृष्टी परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेला राधिका रॉय महिला व गुड गाईज फायनान्शिअल सर्विस या कंपनीच्या नावाने व्हाट्सअप आणि टेलिग्रामवर ऑनलाइन वर्क फ्रॉम होम जॉबचा मेसेज पाठवण्यात आला. त्यानंतर महिलेची वैयक्तिक, बँक खात्याची संपूर्ण माहिती घेण्यात आली. ख्रिसमस ऑफर सुरू असल्याने अकाउंटमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक केल्यास त्यावर २५ ते ७० टक्क्यांपर्यंत कमिशन मिळेल व वर्क फ्रॉम होमचा पगार देखील मिळेल असे अमिष महिलेला दाखवण्यात आले.या आमिषाला बळी पडून महिलेने १८ डिसेंबर २०२४ ते ३० डिसेंबर २०२४ या बारा दिवसांच्या कालावधीत तब्बल २२ लाख २६ हजार १४८ रुपये इतकी रक्कम गुंतवणुकीसाठी ऑनलाइन पाठवली. त्यानंतर महिलेने राधिका रॉय व गुड गाईज फायनान्शिअल सर्विसेसमार्फत देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल क्रमांक बंद होते. महिलेला गुंतवणुकीच्या नावाने सांगण्यात आलेला कोणताही फायदा देण्यात आला नाही. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने बोईसर पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दाखल केली.या फसवणूक प्रकरणी महिलेने राधिका रॉय आणि गुड गाईज फायनान्शिअल सर्विस यांच्या विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) अन्वये राधिका रॉय नावाची महिला, गुड गाईज फायनान्शियल सर्विसेस, एक मोबाईल धारक अज्ञात व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास बोईसर पोलीस करीत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.