गावठी पिस्तुलसह धारदार तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या मामा-भाच्यांचा पाठलाग करीत शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

गावठी पिस्तुलसह धारदार तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या मामा-भाच्यांचा पाठलाग करीत शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून गावठी कट्टुयासह दोन जीवंत काडतूस व तलवार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी शाम साहेबराव सपकाळे (वय ३०, रा. असोदा रोड) व त्याचा भाचा विशाल उर्फ सोनू धनराज सोनवणे (वय २०, रा. असोदा रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाचे स्वागत करतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. म्हणून शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंगसह नाकाबंदी करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध

पथकातील अंमलदार पोहे कॉ गिरीश पाटील, अनिल कांबळे, विकी इंगळे, गजानन वाघ, पराग दुसाने, शाम काळे हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रेकॉर्डवरील संशयित शाम साहेबराव सपकाळे हा हातात गावठी पिस्तुल घेवून दहशत माजवितांना दिसून आला. दरम्यान, पथकाने त्याचा पाठलाग करीत मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गावठी पिस्तुलसह दोन जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. शाम सपकाळे याच्याकडून जीवंत काडतूसांसह गावठी पिस्तुल जप्त केल्यानंतर त्याचा भाचा विशाल उर्फ सोनू सोनवणे याच्याकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली. त्या दोघ मामा भाच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित विशाल हा आजारी असल्याने त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अटकेतील संशयित शाम सपकाळे याला न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. तपास उपनिरीक्षक योगेश ढिकले हे करीत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.