कामोठेत बंद फ्लॅटमध्ये आढळला आई आणि मुलाचा मृतदेह

कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीमलँड अपार्टमेंटमध्ये 70 वर्षीय महिला आणि तिच्या 45 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता दोघांचे मृतदेह आढळून आले. दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिस तपास चालू आहे.  कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीमलँड अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध महिलेचा व तिच्या 45 वर्षीय मुलाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी त्यांच्या घरामध्ये संशयास्पदरित्या आढळून आला. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झालीये. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून कामोठे पोलिसांकडुन या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. या घटनेतील मृत गीता जग्गी (वय 70) व त्यांचा मुलगा जितेंद्र जग्गी (वय 45) हे दोघेही कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीमलँड अपार्टमेंटमध्ये राहण्यात होते. बुधवारी सायंकाळी गीता जग्गी यांच्या फ्लॅटमधुन गॅस गळती होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सदर इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी त्याबाबतची माहिती अग्निशमन दलासह कामोठे पोलिसांना दिली. साधारण सायंकाळी पाच वाजता ड्रीमलँड अपार्टमेंट पोलिसांसह अग्निशमन दलाने धाव घेतली.

यावेळी गीता जग्गी यांच्या फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याचे तो उघडता येत नव्हता. अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर फ्लॅटचा दरवाजा कटरच्या सहाय्याने तोडून आतमध्ये प्रवेश केला. फ्लॅटचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. एका बेडवर गीता जग्गी तर दुसऱ्या बेडवर त्यांचा मुलगा जितेंद्र जग्गी हे दोघेही संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आले. गीता जग्गी यांच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आल्या नाहीत.गीता जग्गी यांचा मुलगा जितेंद्र जग्गी याच्या चेहऱ्यावर काही जखमी दिसल्या. पोलिसांनी या दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत. या दोघांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्यानुसार पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास हा केला जातोय. पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी केली आहे. आता याबद्दल काय खुलासा होतो, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.