देवरे विद्यालयात नव वर्षारंभी आदर्श वर्ग रचना स्पर्धा संपन्न

देवरे विद्यालयात नव वर्षारंभी आदर्श वर्ग रचना स्पर्धा संपन्न

धंगाई विधायक कार्य मंडळाचे  आप्पासो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे नववर्षा आरंभी विद्यालयाच्या परंपरेप्रमाणे आदर्श वर्ग रचना स्पर्धा इ.५ वी ते इ.७ वी लहान गट व इ.८वी ते इ.१०वी मोठा गटांत स्पर्धा आयोजित करण्यात आली.विविध निकषांद्वारे उपस्थिती मान्यवरांचे स्वागत वर्गातील मांडणी सादरीकरण सामूहिक प्रार्थना, संविधान,प्रतिज्ञा, विद्यार्थी ओळखपत्र,वैयक्तिक स्वच्छता, टापटीपपणा,वर्ग स्वच्छता,शिस्त, वर्ग कायम सजावट, तक्ते चित्रे ,भित्तिफलके,फलक लेखन,आरेखन बैठक व्यवस्था, विविध कार्यक्रम स्पर्धा परीक्षा, उपक्रम,यातील सहभाग पाठ्यक्रमावर व सामान्य ज्ञानावर आधारित

विविध प्रश्नोत्तरे या स्वरूपात १०० गुणांचे परीक्षण श्रॉफ हायस्कूल व ज्यु.कॉलेज नंदुरबारचे प्राध्यापक डॉ.युवराज पाटील खोंडामळी केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख आनंदराव करणकाळ,श्रॉफ हायस्कूल नंदुरबार येथील उपशिक्षिका गायत्री पाटील जिल्हा परिषद शाळा खापरखेडा येथील मुख्याध्यापिका मीनल लोखंडे यांनी परीक्षण करून लहान गटातून इ५वीचा वर्ग व मोठ्या गटातून इ.८वीचा वर्ग विजयी ठरला.अनुक्रमे वर्गशिक्षिका एस.एच.गायकवाड,एम.डी. नेरकर व विद्यार्थी यांचा फिरती ढाल देऊन सन्मान करण्यात आला.विद्यार्थ्यांना डॉ.गायत्री पाटील,प्राध्यापक डॉ.युवराज पाटील व मुख्याध्यापक मीनल लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. नववर्षाच्या नव संकल्पनेच्या शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक सी.व्ही.नांद्रे, डी.बी.भारती वाय.डी.बागुल डॉ.आर.आर.बागुल एम.एस. मराठे,ए.एस.बेडसे, व्ही.बी.अहिरे, डी.बी.पाटील,एच.एम. खैरनार,एस.जी.पाटील यांनी परिश्रम घेतले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.