निलेश यांचे संपूर्ण कुटुंबं अपघातात गेले. त्यामुळे घटनेची माहिती मिळताच पिंपरी पेंढारमध्ये शोककाळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास ओतूर पोलीस करत आहे. नववर्षाचे स्वागत सगळीकडे जल्लोषात करण्यात आले. मात्र अपघाताच्या घटनांनी देखील नवीन वर्ष गाजले. त्यातच नगर-कल्याण महामार्गावर काल बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. हे कुटुंब सुट्टी संपवून मुंबईला आपल्या घरी निघाले होते. मात्र, वाहनांची समोरासमोर धडक झाली आणि एकाच कुटुंबातील तिघांचा करुण अंत झाला. या घटनेनं संपूर्ण जुन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.










