पुलाखाली उतरताना मांजा आडवा, नाक कापलं गेलं, गळ्यात मांजा अडकल्याने दुचाकीस्वाराला ४८ टाके

वडगाव-सिन्नर येथील रहिवासी विनोद शिवाजी आढाव यांचे नातलग नांदूरशिंगोटे येथे वास्तव्यास आहेत. त्यांना भेटण्यासाठी विनोद मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पत्नी पौर्णिमा आणि बहीण रत्ना यांना सोबत घेऊन दुचाकीने निघाला होता. सिन्नर वळण रस्त्याने तो संगमनेरकडे जात होते.गेल्या महिनाभरात नायलॉन मांजा दुचाकीला अडकल्याने वावी वेस, संगमनेर नाका, झापवाडी, मुसळगाव पूल या परिसरात पाच जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता एकाच दुचाकीवरील तीन जण नायलॉन मांजाने जखमी झाल्याने कारवाईचा विषय ऐरणीवर आला आहे. नाशिक-पुणे महामार्गाने संगमनेरकडे दुचाकीवरून जात असताना नायलॉन मांजा अडकल्याने तिघे जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.३१) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात वडगाव-सिन्नर येथील विनोद शिवाजी आढाव (वय २४), त्यांची पत्नी पौर्णिमा विनोद आढाव (वय १९) आणि बहीण रत्ना शिवाजी आढाव (वय २०) हे तिघे जखमी झाले. सिन्नरच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वडगाव-सिन्नर येथील रहिवासी विनोद शिवाजी आढाव यांचे नातलग नांदूरशिंगोटे येथे वास्तव्यास आहेत. त्यांना भेटण्यासाठी विनोद मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पत्नी पौर्णिमा आणि बहीण रत्ना यांना सोबत घेऊन दुचाकीने निघाला होता. सिन्नर वळण रस्त्याने तो संगमनेरकडे जात होते. गुरेवाडी पुलाखाली उतरत असताना त्यांच्या दुचाकीला अचानक मांजा आडवा आला. दुचाकी वेगात असल्याने मांजाने विनोदचे नाक कापले गेले. त्याने हाताने मांजा खाली ओढल्याने त्याच्या ओठाखाली मोठी जखम झाली. त्याला सुमारे ४८ टाके घातले आहेत. त्याची पत्नी पौर्णिमा हिने उजव्या हाताने मांजा पकडल्याने तिचा अंगठा आणि त्या शेजारील बोट कापले गेले असून, पाच टाके घातले आहेत. तर रत्ना हिच्याही डाव्या हाताच्या करंगळी शेजारील बोटाला आणि अंगठ्याला जखम झाली आहे. नायलॉन मांजाला बंदी घालण्यासाठी प्रशासनाकडे कडक पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..