नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. लखनऊमधील एका हॉटेलमध्ये ५ जणांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये ४ मुली आणि त्यांच्या आईचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. लखनऊमधील एका हॉटेलमध्ये ५ जणांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये ४ मुली आणि त्यांच्या आईचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. अर्शद असे आरोपीचे नाव असून त्याचे वय सुमारे २४ वर्षे आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. नवीन वर्षाच्या आगमनासाठी संपूर्ण जग सज्ज असताना एक २४ वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबाचा काळ बनला. शुल्लक कारणावरुन त्याने आपल्या बहिणी आणि आईला यमसदनी धाडले. हि धक्कादायक घटना लखनऊ येथे घडली आहे.










