बीड येथे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली आहे. आरोपींच्या तात्काळ अटकेसाठी सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचे आयोजन काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. याप्रकरणातील तीन आरोपी अजून फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. याप्रकरणात गंभीर आरोपही केले गेले. बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आला. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. अजूनही संतोष देशमुख हत्येप्रकरणातील तीन आरोपी मोकाट आहेत. पोलिस त्यांच्या शोधात आहेत. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. सातत्याने कराडच्या अटकेची मागणी केली गेली. मंगळवारी 22 दिवसांपासून फरार असलेला कराड सीआयडीच्या कार्यालयात दाखल होत शरण आला. केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराड आहे. पुण्यातून बीडमध्ये आणून केज न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. रात्री केज कोर्टाबाहेर मोठा ड्रामा देखील बघायला मिळाला.










