नंदुरबार येथे 15 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान श्रीराम विजय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून,

नंदुरबार येथे 15 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान श्रीराम विजय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, श्री श्री 108 श्री महंत परमपूज्य तारादास बापूंच्या नेतृत्वात, श्रीराम सेवा समिती राजाराम मंदिर भक्तीधाम बद्रीझीरा व जय सियाराम भक्त परिवाराकडून श्रीराम विजय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार येथील नंदुरबार शहादा प्रकाश रस्त्यावरील कटारिया मॉल समोरील, श्रीराम नगर येथे श्रीराम सेवा समिती व जय सियाराम भक्त परिवार, तसेच श्री श्री 108 श्री महंत परमपूज्य तारादास बापूजी यांच्या नेतृत्वात, श्रीराम विजय महोत्सवाचे, दिनांक 15 जाaनेवारी ते 22 जानेवारी 2025 दरम्यान आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सर्वांनी सहपरिवार कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन, श्रीराम सेवा समिती व जय सियाराम भक्त परिवार यांच्याकडून करण्यात आले आहे,

सदर कार्यक्रम हा दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी पासून आयोजित करण्यात आला असून, कलश नगर शोभायात्रा, महायज्ञ, संध्या भजन कीर्तन, रामधुन, सुंदर कांड पाठ, कवी संमेलन, संत संमेलन व दररोज महाप्रसाद भंडारा, तसेच परमपूज्य संत श्री तारादास बापू यांचा दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी 9 ते 11 वाजेपर्यंत सत्संगाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण शहरातून दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते 12 वाजेच्या दरम्यान शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून, यज्ञ कर्म दररोज सकाळी 8 ते 1 वाजेच्या दरम्यान असणार, तर दररोज सकाळी 11 ते 1 आणि संध्याकाळी 6 ते 8 च्या दरम्यान महाप्रसाद भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे, श्रीराम सेवा समिती व जय सियाराम भक्त परिवार यांच्यातर्फे कळविण्यात आले आहे, तसेच सदर भजन संध्या कार्यक्रम आंतरराष्ट्रीय कलाकार, दिनांक 15 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान रात्री साडेआठ ते साडेअकरा दरम्यान करण्यात आला असून, यात मध्य प्रदेशातील टिकमगड छतरपूर येथील श्रीराम सुंदरकांड भक्त मंडळ, तसेच मुंबई येथील भजन गायक जगदीश चव्हाण, तसेच जळगाव येथील कीर्तनकार हरिभक्त पारायण समाधान महाराज भोजेकर, त्याचप्रमाणे 18 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान रात्री साडेआठ ते साडेअकराच्या दरम्यान राजस्थान बाडमेर येथील भजन गायक छोटेसिंग रावणा, बिहार राज्यातील मधुबनी येथील आंतरराष्ट्रीय हास्यकवी शंभू शिखर, राजस्थान जयपूर येथील भजन तसेच गजल गायक दिनेश भट, तर या सर्व कार्यक्रमात शहादा येथील यज्ञाचार्य शामकांत जोशी यांचे उपस्थिती लाभणार आहे, पूर्णहूती संत संमेलन व आशीर्वचन आरती, दिनांक 22 जानेवारी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत, व त्यानंतर महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, सदर कार्यक्रम हा 15 जानेवारी ते 22 जानेवारी 2025 दरम्यान राहणार असून, या कार्यक्रमाचे नियोजन नंदुरबार शहरातील शहादा प्रकाशा रस्त्यावरील, कटारिया मॉल समोरील श्रीराम नगर येथे करण्यात आले असल्याची माहिती, श्रीराम सेवा समिती व जय सियाराम भक्त परिवार यांच्यातर्फे करण्यात आले आहे, आज दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी या कार्यक्रमाचा भूमिपूजन सोहळा श्री श्री 108 श्री महंत परमपूज्य तारादाजी बापू यांच्याहस्ते भूमिपूजन व ध्वजपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी श्रीराम सेवा समिती व जय सियाराम भक्त परिवार तसेच श्रीराम सेवा समिती राजाराम मंदिर भक्तीधाम बद्रीझीरा व जय सियाराम भक्ती परिवार सर्व उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..