घुसखोर बांगलादेशींवर मुंबई पोलिसांची कारवाई,घरमालकांनाही तंबी

दिल्लीनंतर आता मुंबईतही बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर धडक कारवाई सुरू झाली आहे. मुंबईत अवैधरित्या आलेल्या बांगलादेशी स्थलांतरितांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. मुंबई पोलिसांचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी याबाबत होत असलेल्या कारवाईची माहिती दिली. दिल्लीनंतर आता मुंबईतही बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर धडक कारवाई सुरू झाली आहे. मुंबईत अवैधरित्या आलेल्या बांगलादेशी स्थलांतरितांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. मुंबई पोलिसांचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी याबाबत होत असलेल्या कारवाईची माहिती दिली. त्यांनी सांगितले की,आतापर्यंत १९५ गुन्हे दाखल करून एकूण २७८ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अटक करण्यात आलेल्या ५० बांगलादेशी स्थलांतरितांना परत पाठवण्यात आले आहे.

सत्यनारायण चौधरी पुढे म्हणाले की, गेल्या जवळपास तीन आठवड्यात मुंबईतील विविध भागांतून ५० बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे बांगलादेशी नागरिक मुंबईत भाड्याने राहतात. अशा स्थितीत घर मालकांना विशेष सूचनाही देण्यात आल्या आहेत. भाड्याने घर देण्यापूर्वी भाडेकरूंची संपुर्ण माहिती पोलिसांना द्या. या बाबतीत पोलिसांना सहकार्य न केल्यास कठोर कारवाईचा इशाराही सत्यनारायण चौधरी यांनी दिला. रविवारी रात्री मुंबईतील घाटकोपर येथे पोलिसांनी बेकायदेशीरपणे राहणाऱ्या तीन बांगलादेशींना अटक केली.मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करण्याचे सुरू केले आहे. ज्या बांगलादेशींना अटक केली त्यात शकील यारूल शेख, आलम अलाउद्दीन शेख आणि रसाल अकबर शेख अशी आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेला बांगलादेशी पनवेल येथे राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीत आरोपींनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितले की, बांगलादेश मधून त्यांनी भारतीय सीमेत बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. सध्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या मुद्द्यावरून दिल्लीत जोरदार राजकारण सुरू आहे, हे विशेष. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीचा मुद्दा चांगलाच तापल्याचे दिसून येत आहे. तसेच बेकायदेशीर स्थलांतरितांवरही वेगाने कारवाई करण्यात येत आहे. आणि आता मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे बांगलादेशी स्थलांतरितांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..