न्यायालयाच्या आदेशाने चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

जळगाव  शहरातील जुने जळगाव परिसरात असलेल्या खळे प्लॉटवरील बांधकामवरून वाद झाला होता. वादात एका महिलेला शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली दि.२७ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी महिलेने न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शनिपेठपोलिसात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुने जळगावातील एका परिसरात असलेल्या खळे प्लॉटवर महिलेकडून कायदेशीररित्या बांधकाम केले जात होते. यावेळी दि.२७ जुलै रोजी त्या परिसरात राहणाऱ्या चौघांनी बांधकामास अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली. महिलेने त्यांना दस्ताऐवज दाखविले. मात्र तरी देखील बांधकाम करण्यास मज्जाव करीत साहीत्याची नासधूस केली. महिलेचा भाऊ हा समजूत काढण्यासाठी त्याठिकाणी आला असता, त्याला

चौघांनी शिवीगाळ करीत मारहाण केली महिला भावाला चौघांच्या तावडीतून सोडवित असतांना त्या चौघांनी महिलेसोबत अश्लिल वर्तन करीत तिचा विनयभंग केला होता. दरम्यान, महिला तक्रार देण्यासाठी पोलिसात गेल्या मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. महिलेने तक्रार दिल्यानंतर केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे महिलेने तक्रारीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता.न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संशयित राजेश सोमा खडके, किशोर सोमा खडके, प्रशांत खडके, प्रकाश सोमा खडके यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..