राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष विचारधारेवर चालणारा पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष विचारधारेवर चालणारा पक्ष

पक्षाचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांचे प्रतिपादन

नंदुरबार(प्रतिनिधी) पक्ष संघटन म्हणजे जगन्नाथाचा रथ असतो. प्रत्येक कार्यकर्त्यांना जगन्नाथाचा रथ खेचावा लागणार आहे.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाया हा धर्मनिरपेक्ष विचारांवर आधारीत आहे. धर्मनिरपेक्ष विचारांवर चालण्याचे मोठे आव्हान कार्यकर्त्यांसमोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा यशवंत चव्हाणांच्या पुरोगामी विचार घेवून तसेच शाहू, फूले,आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. संविधानाला मानणारा पक्ष आहे,हे जनमानसात रुजवणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत केले.मदर टेरेसा स्कूलच्या प्रांगणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्म़क आढावा बैठक रविवारी पार पडली.यावेळी ते बोलत होते. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत गावित, पक्षाचे ज्येष्ठ़ माधवमराव चौधरी,रतन पाडवी, अलीम मक्राणी, निखिलभाई तुरखिया,सुरेंद्र कुवर, जि प सदस्य़ मोहन शेवाळे आदी मान्य़वरांसह जिल्हयातील शेकडो कार्यकर्ते,पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत नवापूरची जागा राष्ट्रवादी पक्षाला सुटली हे या राष्ट्रवादी पक्षाला मिळालेले मोठे यश आहे. जि प चे सभापती मोहन शेवाळे यांनी आधी पक्ष सोडला. आता पुन्हा ते याच पक्षात आले. शाम का भूला को, भुला नही कहते,या उक्ती प्रमाणे शेवाळे यांचा पक्ष् प्रवेश केला. भरत गावित यांना मानणारा मोठा वर्ग या लोकसभा मतदार संघात आहे. रतन पाडवी ,माधव चौधरी यांच्याकडून कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन घ्यावे इतके त्यांनी उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत. जो कार्यकर्ता अधिक मेहनत घेईल त्यांना निश्चितच पक्षात मोठे स्थान देण्यात येईल.

मात्र यापुढे कुणाचेही लाड पुरवले जाणार नाहीत.पक्ष बांधणी केवळ पदाधिकाऱ्यांवर अवलंबून नसते तर ती कार्यकर्त्यांसह सर्वांची असते. राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल. मात्र कार्यकर्त्यांनी ज्येष्ठांना मान दिला पाहिजे,अशी माफक अपेक्षा पक्ष् प्रमूख म्हणून माझीआहे,असेही डॉ मोरे यांनी सांगितले. भरत गावित म्हणाले. कार्यकर्त्यांनी पदापेक्षा कामाला महत्व़ दिले पाहिजे.पद हे काही शोभेची वस्तू किंवा मिरवण्याची बाब नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात मोठे यश मिळाले आहे.त्यामुळे अभिनंदनाचा ठराव पारीत करुन तो पक्ष श्रेष्ठींकडे पाठवावा. अजीतदादा पवारांनी आमचे मनोबल वाढवले. नंदुरबार जिल्हयाला निधी कमी पडू दिला जाणार नाही,हे वचन दिले आहे.यापुढे जि प,ग्रांप व नगर पालिका निवडणूकांमध्ये प्रचंड मेहनत घेवून पक्षाचे जास्तीत जास्त़ उमेदवार कसे निवडून येतील,यासाठी आपण कटीबध्द़ राहू,असेही त्यांनी सांगितले.या बैठकीत मोहन माळी,नरेंद्र नगराळे,माधवराव पाटील,सिमा सोनगिरे,जगदीश जायस्वाल,संजय खंदारे, संतोष पराडके,मोंटू जैन,मोहन ढाणे,राजू पवार,जितेंद्र कोकणी,शरद पाटील,इद्रीस पठाण, धनंजय गावित,मनोहर नगराळे,साजिद अन्सारी, सुनिता शिंपी,गजानन वसावे,सागर वळवी, रामसिंग वसावे,ॲड सुरुपसिंग वसावे, रामसिंग वसावे, जितेंद्र वळवी, संगीता पाडवी, उषा तायडे, सुरुपसिंग पाडवी, पुंडलीक राजपूत, गुरुभाई गोसावी, मुजाहीद शेख,सिकंदर कुरेशी, प्रतिभा कुळकर्णी, दिलीप गावित, नकुल देसाई,रविंद्र साळूंखे, धनराज बच्छाव ,बाबा सैय्य़द आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..