आयशर टेम्पोची चारचाकीला जबर धडक : शिवसेना खा.वायकर होते बसलेले

राज्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला रविवारी रात्री उशिरा मुंबईतील जोगेश्वरी भागात एसआरपीएफ कॅम्पच्या गेटजवळ अपघात झाला. पश्चिम द्रुतगती महामार्गावर झालेल्या या अपघाताच्या वेळी वायकर हे त्यांच्या वाहनातच होते. वायकर यांच्या कारला आयशर टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला.

प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. तरी देखील पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. अपघाताच्या वेळी टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय आहे. एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ वायकर यांच्या वाहनाला टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू केली. रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आहेत. अपघाताच्या वेळी टेम्पो चालक दारूच्या नशेत होता का? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. साक्षीदारांचा दावा आहे की, टेम्पो चालकाने बेपर्वाईने वाहन चालवत होता. मात्र, आता या प्रकरणाचा तपास सुरु असून अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..