रब्बीच्या पिकांवर ‘संक्रांत’; येवला तालुक्यात कांदा, मका, गहूचे अवकाळी पावसाने नुकसान, बळीराजा हवालदिल

येवला तालुक्यात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास सुमारे अर्धा ते एक तास झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीपाठोपाठ अवकाळी पावसाच्या फटक्याने बळीराजाला हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने तालुक्यातील कांदा, मका, गहू ही रब्बी पिके संकटात सापडली आहेत.गेले काही दिवस कडक्याची थंडी असताना अवकाळी पावसालाही अनुकूल वातावरण तयार झाले. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने व वातावरणीय बदलांमुळे ऐन हिवाळ्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावली. येवला शहरासह तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी रात्री वातावरणात अचानक बदल झाला. मध्यरात्री सुरू झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे अर्धा ते एक तासावरून अधिक काळ जोरदार हजेरी लावली.

उन्हाळी कांद्याच्या रोपांना व रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. खरीप कांदा, कांदे रोप, मका, गहू या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा ओला झाला तर काढणीला आलेला कांदा जमिनीतच सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काढून ठेवलेला मकाही पावसाने ओला झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. तालुक्यात काही ठिकाणी तर या पावसाने गहू आडवा झाला आहे. दरम्यान, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.निफाड तालुक्यात शनिवारी काही भागात पाऊस झाला. पिंपळगाव, ओझर, निफाड याठिकाणी साधारणपणे १५ ते ३० मिनिटे पाऊस झाला. हलक्या स्वरूपाचा पाऊस असल्याने जास्त नुकसान झाले नसल्याची माहिती आहे. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पिंपळगाव, ओझर, आहेरगाव, शिरवाडे वणी या भागात पाऊस झाला. तर निफाड व परिसरात रात्री २ वाजेच्या सुमारास पाऊस झाला. निफाड तहसील कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तालुक्यातील सात महसूल मंडळांमध्ये पाऊस ३ ते ७ मिलिमीटर पाऊस झाला पण, कोणतेही नुकसान झालेले नाही. दरम्यान, पहाटे दाट धुके पडलेले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते. द्राक्ष बागांवर औषधे फवारणीचा खर्च वाढणार आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..