तुफान बर्फवृष्टीमुळे रात्रभर बसमध्येच; काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक सुखरुप

दुपारी अडीचच्या सुमारास बर्फवृष्टी सुरू झाली आणि अगदी थोड्याच वेळात रस्त्यावर बर्फाचे ढिग जमा होऊ लागले. सुरुवातीला सगळ्यांनाच खूप मजा वाटली, पण बर्फवृष्टी वाढली आणि काळजाचा ठोका चुकला. श्रीनगरला निघालेले आम्ही सोनमर्गजवळच अडकून पडलो. कडाक्याची थंडी होती. बसमधून खाली उतरून चालत जाणे अशक्य होते. संपूर्ण रात्र बसमध्येच काढावी लागली…’ महाराष्ट्रातून काश्मीरमध्ये गेलेल्या २६ पर्यटकांच्या या स्थितीवरून तेथील स्थितीचा अंदाज बांधता येतो.सध्या उत्तर भारतात हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर या भागांमध्ये प्रचंड बर्फवृष्टी सुरू असून, त्याचा फटका पर्यटकांनाही बसला आहे. कुलु-मनालीजवळील अटल बोगद्याजवळ काही गाड्या अडकून पडल्यानंतर शुक्रवारी काश्मीर खोऱ्यातही प्रचंड बर्फवृष्टी झाली. केसरी ट्रॅव्हल्सच्या २६ जणांची ही टीम सोनमर्गवरून श्रीनगरच्या दिशेने परतीचा प्रवास करायला निघाली होती. शनिवारी श्रीनगरहून त्यांचे परतीचे विमान होते. मात्र, दुपारी दीडच्या सुमारास सुरू झालेली बर्फवृष्टी थांबण्याचे नावच घेत नव्हती. केसरी टूर्सचे टूर ऑपरेटर अतुल शिंदे यांनी या रात्रीचा अनुभव सांगितला.

‘रस्ते बंद करण्याचा निर्णय न झाल्याने बराच गोंधळ उडाला होता. श्रीनगरला जाण्यासाठी असलेल्या लष्कराच्या बायपास मार्गावरून आम्ही पुढे निघालो. पण, जेमतेम तीन किलोमीटर गेल्यावर आणखी पुढे जाणे धोकादायक असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आमच्या चालकाने बस सुरक्षित जागी उभी केली. रस्त्यावर एक फुटापेक्षा जास्त बर्फ साचल्याने आणि बसमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक असल्याने खाली उतरणे अशक्य होते’, असे अतुल यांनी सांगितले.दीड-दोन किलोमीटरवर असलेल्या हॉटेल अकबरच्या जफरभाई यांना अतुल यांनी या परिस्थितीची माहिती देताच रात्री बाराच्या सुमारास जफरभाई यांनी गरमागरम जेवण पाठवले. तसेच सकाळ झाल्यानंतर हॉटेल अकबर आणि सोनमर्ग पॅलेस हॉटेलच्या इम्तियाज यांनी छोट्या गाड्यांसह बसमधील पर्यटकांना पुन्हा सोनमर्गला आणल्याचे अतुल यांनी नमूद केले.सध्या हे सर्व पर्यटक सोनमर्गला असून रविवारी ते श्रीनगरच्या दिशेने रवाना होतील. या पर्यटकांची परतीची तिकिटे शनिवारची होती. मात्र ती रद्द करावी लागल्याने आणि १ जानेवारीपर्यंत तिकिटे उपलब्ध नसल्याने त्यांची सोय श्रीनगरमध्येच नाममात्र शुल्क आकारून करण्यात आल्याचे केसरी टूर्सच्या शैलेश पाटील यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..