कटलेल्या पतंगाच्या मागे पळताना विहिरीत पडून दोन मुलांचा मृत्यू

पतंग उडवितेवेळी कटलेला पतंग पकडण्यासाठी पळत असताना दोन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच अहिल्यानगर तालुक्यातील पोखर्डी शिवारात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अनिकेत रतन आल्हाट (वय ११) व दिनेश विशाल देठे (वय १०) अशी मयत मुलांची नावे आहेत. पोखर्डी गावा जवळच चंद्रकांत सुंदर देठे यांची शेत असून त्याठिकाणी त्यांची विहीर आहे. शाळेला सुट्ट्या असल्याने काही मुले शुक्रवारी सायंकाळी देठे यांच्या विहिरीपासून जवळच पतंग उडवित होते. त्यातील एक पतंग कटल्याने तो पकडण्यासाठी अनिकेत व दिनेश पतंगाच्या दिशेने पळत सुटले व ते दोघे विहिरीत पडले.

त्यांच्या सोबत असलेल्या इतर मुलांच्या ही घटना लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक त्या ठिकाणी जमा झाले. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी दोन्ही मुलांना विहिरीतून तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रूग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच वेळी दोन कुटुंबातील मुलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात नागरिक त्या ठिकाणी जमा झाले. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.नागरिकांनी दोन्ही मुलांना विहिरीतून तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रूग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच वेळी दोन कुटुंबातील मुलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..