राज्यात ३०३.५३ लाख टन उसाचे गाळप; जिल्ह्यात किती?

राज्यात यंदाच्या गळीत हंगामात २६ डिसेंबरअखेर एकूण १८९ साखर कारखाने सुरू झाले आहेत. या साखर कारखान्यांनी ३०३.५३ लाख टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत २५८.१४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे, असे साखर आयुक्तालयातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याचा एकूण सरासरी साखर रिकव्हरी दर सुमारे ८.५ टक्के इतका आहे. पुणे विभागात ७६.५४ लाख टन उसाचे गाळप झाले असून सरासरी साखर उत्पादन ६५.९४ लाख क्विंटल झाले आहे. साखरेचा उतारा सरासरी ८.६२ टक्के आहे. विभागात ३१ कारखाने कार्यरत असून त्यामध्ये १८ सहकारी आणि १३ कारखान्यांचा समावेश आहे.

कोल्हापूर विभागात ३९ कारखाने (२६ सहकारी आणि १३ खाजगी) आहेत. या कारखान्यांनी ७०.०६ लाख टन उसाचे गाळप केले असून, ७०.१६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागात राज्यातील सर्वाधिक १०.०१ टक्के साखर उतारा आहे. सोलापुरात ४१ कारखाने कार्यरत असून यामध्ये १६ सहकारी आणि २५ खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी ५३.०४ लाख टन उसाचे गाळप करून ३९.८६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विभागाचा साखर उतारा ७.५२ टक्के आहे.अहिल्यानगर विभागात २५ कारखाने कार्यरत असून त्यापैकी १५ सहकारी आणि १० खाजगी आहेत. या कारखान्यांनी ३८.६४ लाख टन उसाचे गाळप केले आहे. एकूण ३०.३६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून त्याचा उतारा ७.८६ टक्के आहे. नांदेडमध्ये ९ सहकारी आणि १९ खाजगी अशा एकूण २८ कारखान्यांनी ३४.७८ लाख टन उसाचे गाळप केले असून ८.५८ टक्के साखर उताऱ्यासह २९.८३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात १९ कारखान्यांनी (११) सहकारी आणि ८ खाजगी) २६.९४ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यांनी १९.१९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाच उतारा ७.१२ टक्के आहे. अमरावती विभागात चार साखर कारखान्यांनी काम सुरू केले असून त्यात एक सहकारी आणि तीन खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी ३.२४ लाख टन उसाचे गाळप केले असून, २.६२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. नागपूर विभागात २ खाजगी कारखाने सुरु असून त्यांनी ०.२९ लाख टन उसाचे गाळप करून ०.१८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..