बर्थडे पार्टीहून परतताना मायलेकावर काळाचा घाला; ऑटोरिक्षा उलटली अन्… घटनेने पंचक्रोशीत हळहळ

नागपूर शहराच्या हिंगणा येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भरधाव ऑटो दुभाजकावर धडकून उलटून भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ऑटो चालकासह त्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे  नागपूर शहराच्या हिंगणा येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भरधाव ऑटो दुभाजकावर धडकून उलटून भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ऑटो चालकासह त्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोहित गोपाल साखरे (25) आणि त्याची आई करुणा गोपाल साखरे (वय 49) असे मृतकांचे नावे आहेत. रोहित गोपाल साखरे हा ऑटो चालक असून त्याची आई करुणा गोपाल साखरे ही अंगणवाडी सेविका होती. हे दोघेही रोहितच्या चुलत बहिणीकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले होते त्यानंतर घरी परतताना ही दुर्दैवी घटना घडली.

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले.पोलिसांच्या माहितीनुसार मृतक रोहित आणि त्याची आई रोहितच्या चुलत बहिणीकडे वाढदिवसाला गेले होते. दरम्यान कार्यक्रम आटपून रात्री ऑटोने घरी परत असताना रोहित हा फार वेगाने ऑटो चालवत होता. त्यामुळे त्याचे ऑटोवरील नियंत्रण सुटले. यातच भरधाव गतीने ऑटो दुभाजकावर आदळला आणि त्यानंतर ऑटो रस्त्यावर उलटला. त्यामुळे चालक रोहित आणि मागच्या प्रवासी सीटवर बसलेली त्याची आई करुणा दोघांनाही डोक्यावर आणि हातापायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. एमआयडीसी-वाडी मार्गाने जाणाऱ्या काही नागरिकांनी या अपघाताची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार महेश चव्हाण आणि त्यांचा स्टाफ हा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. तर या घटनेत एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..