देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे राष्टीय चित्रकला स्पर्धा: सर्जनशील विचार कुंचल्यातून चित्रात विद्यार्थ्यांनी भरले रंग .

देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे राष्टीय चित्रकला स्पर्धा: सर्जनशील विचार कुंचल्यातून चित्रात विद्यार्थ्यांनी भरले रंग .

भुसावळ प्रतिनिधी युवराज कुरकुरे थोरगव्हाण ता रावेर येथील दी एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण स्थापना ( 1917 ) डी एस देशमुख विद्यालया तर्फे भारताचे माजी पंतप्रधान स्व डॉ . मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली . शालेय परिपाठ वेळी विद्यार्थ्यांना त्यांचे जीपन कार्याची माहिती वाय जे कुरकुरे यांनी दिली . भारतीय बालकल्याण परिषद दिल्ली आयोजित राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली . 120 विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला . सामाजिक व पर्यावरणीय विषय यावर प्रबोधन करणारे विषयावर विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशिलते आधारे कुंचल्यातून सुंदर चित्र काढून समाज मनाचे रंगभरले . जिल्हा बालकल्याण समितीचे महेंद्र पाटील मु .पो मनुर ता . बोदवड यांचे अध्यक्षते खाली ही स्पर्धा संपन्न झाली . याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा बालकल्याण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर शालेय समिती सदस्य मधुकर कोल्हे , संचालक नंदकुमार चौधरी , रविंद्र पाटील ( मनुर ) यांची प्रमुख अस्थिती लाभली . कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना खडू फळा चारभिंतीच्या बाहेरील जगात घेवुन जाण्याचा तसेच त्यांचे कडील स्तुप्त गुणांना प्रकट करण्यासाठी व भावी चित्रकार निर्माण करण्यासाठी असे प्रबोधन कार्यक्रम बालकल्याण समिती करते . उत्कृष्ठ चित्रास पारितोषिक तथा शिष्यवृती दिली जाते . बालकांनी केलेल्या अलौकीक प्राणरक्षक कार्यासाठी महामहीम राष्ट्रपती यांचे शुभ हस्ते विशेष शौर्य पुरस्कार दिला जातो .

संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या . विद्यार्थ्यांना चित्रकाढणा साठी ड्रॉइंगशिट दिले . विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देणारे कार्यकमाचे आयोजन व नियोजन याचे अभिनंदन व कौतुक केले . बालकल्याण समितीच्या शिफारशीने आपल्या जिल्ह्यात समितीने चार शौर्य पुरस्कार महामहीम राष्ट्रपती यांचे शुभहस्ते प्रदान केले आहे असे स्पष्ट केले . प्रास्ताविक एस बी सपकाळे यांनी केले .अकरा ते दोन या वेळेत ही स्पर्धा विद्यालयात प्रार्थना आवारात मोकळ्या जागेत घेण्यात आली . परीक्षेचे नियोजन कला शिक्षक एस बी सपकाळे यांनी केले . विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी त्यांनी उद्युक्त व मार्गदर्शन केले . विद्यार्थ्यासाठी ही स्पर्धा मोफत होती . टी पी घुले यांनी सहकार्य केले . या प्रसंगी संस्थेचे माजी संचालक प्रविण पाटील , पालकसंघाचे उपाध्यक्ष शिक्षक संतोष राणे यांनी भेट दिली उपक्रमाचे कौतुक केले . समारोप प्रसंगी माजी संचालक प्रविण पाटील मुख्याधापक सत्यनारायण वैष्णव यांनी मनोगत वक्त केले . बालकल्याण समितीने ही चित्रकला स्पर्धा विद्यालयात आयोजित केल्या साठी धन्यवाद दिले . संस्थेचे सचिव पवन चौधरी सहसचिव रामराव देशमुख सर्वसन्मानिय संचालक बंधुभगिनी यांनी या चित्रकला स्पर्धा अक्रमाचे स्वागत केले आहे . चित्रकला स्पर्धा यशस्वीतेसाठी कला शिक्षक एस बी सपकाळे वाय जे कुरकुरे यांचे सह सर्व शिक्षक बंधुभगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी सहकार्य केले . कार्यप्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन कलाशिक्षक एस बी सपकाळे यांनी तर आभार वाय जे कुरकुरे यांनी सादर केले .

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..