मनमोहन सिंग यांच्या जाण्याने एका सक्षम नेतृत्वाला आणि अभ्यासू राजकारण्याला मुकला आहे. त्यांनी देशाला दिलेल्या उल्लेखनीय अशा योगदानात त्यांचे एक अमुल्य योगदान म्हणजे देशातील शेतकऱ्यांना सर्वप्रथम कर्जमाफी मिळाली ती दिवंगत पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या काळात.भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. वृद्धापकाळातील प्रकृती अस्वास्थामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने देश एका सक्षम नेतृत्वाला आणि अभ्यासू राजकारण्याला मुकला आहे. त्यांनी देशाला दिलेल्या उल्लेखनीय अशा योगदानात त्यांचे एक अमुल्य योगदान म्हणजेदेशातील शेतकऱ्यांना सर्वप्रथम कर्जमाफी मिळाली ती दिवंगत पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या काळात. या कर्जमाफीचे सर्वप्रथम संकेत अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे स्वत: डॉ. मनमोहनसिंग यांनी दिले होते. त्यानंतर काही दिवसांतच केंद्रीय अर्थसंकल्पात ६० हजार कोटी रुपयांच्या या कर्जमाफीची घोषणा आणि नंतर अंमलबजावणीही झाली होती. डॉ. सिंग यांच्या निधनानंतर या आठवणी जाग्या झाल्या आहेत.










