खटारा बसेस बिंदास रस्त्यावर धावत आहेत: मनसेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण दुदले.
पुणे पाचोरा बस एम एच 20 बी एल 2409 पाचोरा आगर बस
या बसने स्वतः प्रवास करत असताना काल रोजी मालेगाव ते पाचोरा प्रवास करत असताना मिळालेला अनुभव
सध्या आपण बघत आहोत रस्ते अपघाताचे प्रमाण खूप वाढलेले आहे अशातच प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी हा व्हिडिओ स्वतः जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण दुदले यांनी काढलेला होता.

यामध्ये अत्यंत भंगार झालेली एस टी महामंडळाची गाडी क्रमांक MH 20 BL 2409 तिची स्टेरिंग ही नीट हॅण्डलिंग करता येत नाही रस्ता चांगला असताना सुद्धा स्टेरिंग व्हायब्रेशन करून गाडी इकडे तिकडे चालत होती आपण बघू शकता ड्रायव्हर कशा परिस्थितीमध्ये गाडी चालवत आहे जर का चुकून इकडे तिकडे तोल गेला तर अपघात झालास म्हणून समजा शेकडो प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचे काम जर कोणी करत असेल तर याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे अशा प्रकारच्या बसेस आता रिटायर करण्याची वेळ आली आहे तरी याकडे कोणाचीही लक्ष नाही खरंतर ड्रायव्हर दादांचे कौतुक करायला पाहिजे की अशी बस त्यानी हँडलिंग होत नसताना सर्व प्रवाशांना घेऊन सुरक्षित पाचोरा आगारात आणली पण ही गोष्ट किती गंभीर स्वरूपाची आहे ही बाब संबंधित एसटी महामंडळ अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही का? जर अशा बस चा अपघात झाला तर किती लोकांना प्राणाला मुकावे लागेल, अशा होणाऱ्या ड्रायव्हर यांना वेदना एसटी महामंडळाला कळत नाही का? का अशा खटारा बसेस बिंदास रस्त्यावर धावत आहेत? महाराष्ट्र राज्य महा मंडळ व संबंधित बस पाचोरा आगार यांनी आकडे लक्ष द्यायला हवे व प्रवाशांचे जीवाची बाजी न लावता सुरक्षित प्रवास कसा होईल या गोष्टीला गांभीर्याने घ्यायला हवेलवकरात लवकर बसेसची दुरुस्ती करावी नाहीतर मनसे स्टाईलने आम्हाला आंदोलन करावे लागेल असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण विट्ठल दुंदुले यांनी केले आहे.









