प्रार्थना झाली, खोलीत झोपायला गेली; शासकीय आश्रमशाळेत चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू

तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अलिविहीर आश्रमशाळेत इयत्ता दुसरीत तमन्ना बाज्या बसावे (वय ८) शिकत होती. २५ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजेला आश्रमशाळेत प्रार्थना घेण्यात आली.नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील अलिविहीर येथे आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय आश्रम शाळा आहे. येथे इयत्ता दुसरीत शिकत असलेल्या आठ वर्षीय विद्यार्थिनी रात्री प्रार्थना केल्यानंतर मध्यरात्री बाथरूमला गेली होती. त्यानंतर ती झोपी गेली. सकाळी ती उठलीच नाही. तिला रुग्णवाहिकेतून तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत असल्याचे घोषित केले. तिचा संशयितरित्या मृत्यू झाला असून मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे मात्र अद्याप उघड झाले नाही. या प्रकरणी शाळेतील सुरक्षिततेच्या आणि व्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अलिविहीर आश्रमशाळेत इयत्ता दुसरीत तमन्ना बाज्या बसावे (वय ८) शिकत होती. २५ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजेला आश्रमशाळेत प्रार्थना घेण्यात आली. यावेळी १४६ विद्यार्थ्यांमध्ये तिचाही सहभाग होता. तिने रात्रीचे जेवणही केले. त्यानंतर ती झोपी गेली. तिच्या मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार, मध्यरात्री ती बाथरूमसाठीही गेली होती. दरम्यान सकाळी प्रार्थना होत असताना तमन्ना दिसली नाही. त्यामुळे गृहपालांनी तिच्या वसतिगृहात जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती हालचाल करत नसल्याचे दिसून आले. तिला तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेलं नाही.तमन्नाच्या अचानक मृत्यूमुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. एक निरागस मुलगी अशा परिस्थितीत मृत्यूमुखी पडल्याने शाळेतील सुरक्षिततेच्या व व्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. तमन्नाच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून योग्य न्यायाची मागणी करण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..