दुचाकीस्वारांंमध्ये भांडण झाले, डिक्कीत लपवलेले ‘गुपित’ उघडकीस आले, गर्दी जमा होताच…

 कर्जत पोलिसांनी अमली पदार्थांचा वापर आपल्या हद्दीतील कोणत्याही फार्म हाऊस, रिसॉर्ट मध्ये होऊ नये यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहेकर्जत नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर तीन गाड्यांचा अपघात झाला. त्यावेळी दोन दुचाकी चालक यांच्या भांडण झाले आणि गर्दी जमल्याचे बघून त्यातील एक दुचाकीचालक अन्य सहकाऱ्यांसह पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र घटना स्थळी पोलिसांना सापडलेल्या टीव्हीएस स्कुटी गाडीच्या डिक्कीत गांजा आणि चरस या अमली पदार्थांची पाकिटे आढळून आली आहेत. दरम्यान, कर्जत पोलिसांनी अमली पदार्थाची तस्करी करण्याचा प्रकार उधळून लावला असून स्वतःची गाडी टाकून पाळल्याने तरुणाकडे नक्की काय होते? याबाबत पोलीस तपास करीत असून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सध्या सुट्ट्या असल्याने पर्यटक फिरायला निघाले असून, कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर आज सकाळी साडे अकरा-बारा वाजण्याच्या सुमारास एक पल्सर, एक टीव्हीएस स्कुटी आणि सिटी होंडा कार या तीन गाड्यांचा कोषाने येथे अपघात झाला. त्यावेळी या तिन्ही गाड्यांचे मालक हे एकमेकांशी भांडू लागले.त्यावेळी गर्दी जमू लागल्यावर पल्सर गाडीवरून दोन तरुण पळून गेले. अपघात झाल्याची माहिती मिळताच कर्जत चारफाटा येथे बंदोबस्त करीत असलेले वाहतूक पोलीस तेथे पोहचले. त्यावेळी कर्जत पोलीस ठाण्यातून आणखी काही पोलीस तेथे पोहचले. आणि त्या पोलिसांनी टीव्हीएस स्कुटी गाडीची उघडी असलेली डिकी तपासली असता, गांजा आणि चरस या अमली पदार्थांची काही पाकिटे त्यात आढळून आली. हा प्रकार समोर आल्यावर सिटी होंडा कार चालक याच्या गाडीचे नुकसान झाल्यानंतर कोणतीही भरपाई न मागता तेथून निघून गेला.तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टीव्हीएस स्कुटी गाडी एम एच ०४ के एन ९३५३ या क्रमांकाच्या गाडीच्या डिकीत अमली पदार्थ आढळून आल्याने पोलिसांनी गाडीचे हॅण्डल लॉक करून पळून गेलेल्या तरुणाची वाट न बघता एका टेम्पो मध्ये ती स्कुटी भरून पोलीस ठाण्यात नेण्यात आली. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे अमली पदार्थ घेऊन जाणारी गाडी ताब्यात घेता आली आहे. तर दुसरीकडे कर्जत पोलिसांनी अमली पदार्थांचा वापर आपल्या हद्दीतील कोणत्याही फार्म हाऊस, रिसॉर्ट मध्ये होऊ नये यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..