आरोपी विशाल गवळी सात दिवस पोलिस कोठडीत, रेल्वेने पोहोचला होता शेगावमध्ये

कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली असून, त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. विशालची पत्नी साक्षीनेही या गुन्ह्यात साथ दिली होती, तिलाही पोलिसांनी अटक केली आहे. कल्याणमधील घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. आरोपी हा मुलीची हत्या करून थेट शेगावला पोहोचला. पोलिसांनी काही वेळातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीचे नाव विशाल गवळी असून तो कल्याणचा रहिवासी आहे. विशाल गवळी याला न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाकडून सुनावण्यात आली. या हत्येत विशालची पत्नी साक्षी हिने त्याची साथ दिली. तिलाही पोलिसांकडून न्यायालयात हजर केले असता तिला 2 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीये.

कल्याणच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली. आता पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. कल्याणच्या चक्कीनाका परिसरात 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर तिची हत्या केली. हैराण करणारे म्हणजे आरोपीच्या पत्नीने त्याची साथ या गुन्हात दिली.आरोपी विशाल गवळी याची पत्नी साक्षी गवळी ही बँकेत नोकरी करते. विशालने 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. यानंतर साक्षी ही घरी परतली. घरात तिने रक्त बघितले. यावेळी तिने घरात सांडलेले पूर्ण रक्त पुसून टाकले. हेच नाही तर रात्री विशालसोबत ती मृतदेह भरलेली बॅग घेऊन कब्रस्थानमध्ये पोहोचली. दोन्ही पती पत्नींनी ही बॅग तिथे फेकून दिली. यानंतर विशाल हा दादरहून थेट शेगावला निघाला.सध्या एक सीसीटीव्ही फुटेज देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आरोपी विशाल गवळी हा ओळख लपवण्यासाठी दाढी काढण्यासाठी दुकानात गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशालला शेगाव आणि त्याची पत्नी साक्षी हिला राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. आता दोघांनाही पोलिस कोठडीत पाठवण्यात आलंय. आरोपी अजून काही मोठे खुलासे करू शकतात. मात्र, या घटनेने मोठी खळबळ निर्माण झालीये.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..