भीषण अपघातात विमानाचे दोन तुकडे; दुर्घटनेआधी बहुतांश प्रवासी एकाएकी बेशुद्ध कसे झाले?

कझाकिस्तानात आज भीषण विमान अपघात झाला. अझरबैजान एअरलाईन्सनं विमान धावपट्टीवर उतरत असताना अपघातग्रस्त झालं. अझरबैजान एअरलाईन्सचं एम्ब्रेयर E190AR बाकूहून रशियाच्या चेचेन्याला जात होतं.अस्ताना: कझाकिस्तानात आज भीषण विमान अपघात झाला. अझरबैजान एअरलाईन्सनं विमान धावपट्टीवर उतरत असताना अपघातग्रस्त झालं. अझरबैजान एअरलाईन्सचं एम्ब्रेयर E190AR बाकूहून रशियाच्या चेचेन्याला जात होतं. या विमानात ६७ जण होते. यातील ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतून २५ जण बचावले आहेत.

कझाकिस्तानच्या अक्तो शहराजवळ कॅस्पियन समुद्र आहे. त्याच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर विमानाला अपघात झाला. बचाव दलानं तत्परता दाखवल्यानं अनेक प्रवाशांचा जीव वाचला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी बचावलेल्या प्रवाशांचे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यात दिसत असलेल्या एका महिलेला जबर मानसिक धक्का बसल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे. ती वेदनेनं विव्हळत आहे. व्हिडीओत एक पुरुष लंगडत चालताना दिसत आहे. त्याला अन्य कोणतीही जखम झालेली नाही. दुसऱ्या एका व्हिडीओत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह दिसत आहेत.अपघातानंतर विमानाचे दोन तुकडे झाले. त्यामधून काही जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. त्यांच्या चेहऱ्यांवर भीती स्पष्ट दिसत होती. अग्निशमन दलासह बचाव पथकांनी परिस्थिती हाताळली. विमानाला लागण्यात आलेली विझवण्यात आली. जखमींना रुग्णवाहिकांमधून रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.स्थानिक अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासानंतर दिलेल्या माहितीनुसार, विमानाला पक्षी धडकल्यानं दुर्घटना घडली. ऑर्डा वृत्तसंस्थेनं प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या इंजिनाला एका पक्षानं धडक दिली. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. याच कारणानं विमानाला अपघात होण्याआधीच त्यातले अनेक प्रवासी बेशुद्ध झाले होते.विमान अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. त्याचील एका व्हिडीओमध्ये विमान अतिशय वेगात खाली येताना दिसत आहे. काही सेकंदांमध्ये ते जमिनीवर येऊन आदळतं. त्यानंतर त्याला भीषण आग लागते. दुसऱ्या व्हिडीओमध्ये विमानाला लागलेली आग विझवण्याचं काम सुरु असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओत काही प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात येत असल्याचं दिसत आहे. अपघातानं अनेक प्रवाशांना जबर मानसिक धक्का बसला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर भीती, दहशत अगदी स्पष्ट दिसत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..