अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या भडगाव तालुकाध्यक्ष पदी निलेश महाले यांची निवड.
भडगाव तालुका प्रतिनिधी: यशकुमार पाटील
भडगाव : येथील शासकीय विश्रामगृह येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अ.भा.ग्रा. पत्रकार संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष भानुदास महाजन यांच्या उपस्थितीत भडगाव तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली.

अ.भा.ग्रा. पत्रावर संघाच्या भडगाव तालुकाध्यक्षपदी दैनिक नवराष्ट्राचे प्रतिनिधी निलेश महाले , यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी विलास पाटील , सचिव भाऊसाहेब सूर्यवंशी , खजिनदार समाधान पाटील , अमित पिंजा री, सहसचिव सतीश पाटील, कार्याध्यक्ष अमित शहा , सहकार्याध्यक्ष संजय महाजन, सदस्य गुलाब पगार सदस्य चेतन पवार, यांचे बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष भानुदास महाजन, जिल्हा उपाध्यक्ष संजय कोतकर , उपाध्यक्ष संजय पाटील , कोषाध्यक्ष भरत चव्हाण, जिल्हा सचिव दीपक अमृतकर , जिल्हा चिटणीस डॉ.बी.बी. भोसले , जिल्हा सहसचिव आनंद महाजन , जिल्हा खजिनदार संजय कोतकर , यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी अ.भा. ग्रा. पत्रकार संघ जळगाव जिल्हा अध्यक्ष भानुदास महाजन यांच्या हस्ते भडगाव तालुका अध्यक्ष निलेश महाले यांचा व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला .









