नैनीतालमध्ये भीषण अपघात, बस खोल दरीत कोसळली; घटनेचा भयंकर Video समोर

नैनीतालमध्ये भीषण बस अपघात झाला. बस खोल दरीत कोसळली. यात अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यात भीषण रस्ते अपघात झाला आहे. नैनीताल जिल्ह्यातील भीमतालमध्ये एक बस खोल दरीत कोसळली. या अपघातात अनेक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी तात्काळ मदतकार्य पाठवण्यात आलं आहे. अपघात झाला तो रस्ता दुर्गम असल्यामुळे त्या रस्त्यावरुन टीमला पोहोचायला वेळ लागला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर एसडीआरएफ आणि पोलिसांनी बचावकार्य सुरू केलं. जखमींना खोल दरीतून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये २० ते २५ जण होते.ही बस पिथौरागढहून हल्द्वानीला जात असताना भीमतालजवळ हा अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या बचाव पथकाकडून मदतकार्य सुरू आहे. मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुष असल्याचं सांगण्यात येत आहे. बस खोल दरीत कोसळल्याने मदतकार्य पोहोचण्यास अडथळे येत आहेत. या घटनेनंतर १५ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भीमताल बस अपघाताबाबत सोशल मीडिया एक्सवर माहिती शेअर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी लिहिलंय, की भीमतालजवळ बस अपघाताची बातमी अत्यंत दुःखद आहे. स्थानिक प्रशासनाला तातडीने मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मी बाबा केदार यांच्याकडे प्रार्थना करतो.याशिवाय या परिसरात आणखी एक दुसरा अपघात झाला. सकाळी बागेश्वरहून देहरादून जाणाऱ्या एका बसला ऋषिकेश-देहरादून रस्त्यावर भीषण अपघात झाला. बस अनियंत्रित झाल्याने अपघात झाल्याची माहिती आहे. बसमध्ये एकून ४५ प्रवासी होते. हे सर्व विद्यार्थी होते. ते सर्व विद्यार्थी क्रीडा महाकुंभात सहभागी होण्यासाठी दून येथे जात होते. हा कार्यक्रम डेहराडूनच्या महाराणा प्रताप स्पोर्ट्स कॉलेजमध्ये होत आहे. त्याचवेळी हा भीषण अपघात झाला. SDRF घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..