मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाळधी येथिल 30 कोटींची ऐतिहासिक योजना पूर्णत्वास”

“जलसेवेतून जनसेवेचा वसा – मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाळधी येथिल 30 कोटींची ऐतिहासिक योजना पूर्णत्वास” पाळधी /धरणगाव/   मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी वासियांना दिलेले वचन पाळत पाळधी येथे 30 कोटी रुपयांच्या सोलर पाणीपुरवठा योजनेचा यशस्वी अमल केला आहे. काल त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह या ऐतिहासिक योजनेचे संपूर्ण पाहणी करून दर्जेदार पद्धतीने पूर्ण झालेल्या कामाचे कौतुक केले. याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणे हे माझ्यासाठी आद्य कर्तव्य आहे. “राज्यातील प्रत्येक गावातील पाणीटंचाई मिटवणे हीच खरी सेवा आहे. यापुढेही जनतेच्या विकासासाठीच काम करणार असून तिसऱ्यांदा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून मला संधी मिळाली आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील प्रलंबित आणि प्रगतीपथावर असलेल्या कामांना पूर्णत्वास नेण्यासाठी मिशन मोडवर काम करणार असल्याचे सांगत लवकरच राज्यभर दौरा करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे होते.

म.जी. प्रा. चे कार्यकारी अभियंता एस. सी. निकम यांनी प्रास्ताविकात सांगितले की, ही सोलरवर आधारित पहिली योजना असून, 30 कोटींच्या निधीतून ती पूर्ण झाली आहे. या योजनेअंतर्गत फिल्टर प्लांटमध्ये दिवसाला 40 लाख लिटर पाणी शुद्ध केले जात असून, 4 हजार 800 नळ जोडण्याची सुविधा गावांना उपलब्ध झाली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले तर आभार सरपंच विजय पाटील यांनी मानले.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांचे कौतुक करत सांगितले की, “महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे पुण्य कार्य त्यांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे त्यांना ‘राज्याचे वाटर मॅन’ म्हणून ओळख मिळाली आहे.” याप्रसंगी सरपंच विजय पाटील, शरद कोळी, उपसरपंच दयानंद कोळी, गटविकास अधिकारी अजयसिंग पवार, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे , जि. प. चे कार्यकारी अभियंता गणेश भोगवाडे , म. जी. प्रा . चे कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, उप अभियंता कमलेश झाडे, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे ग्राम विकास अधिकारी डी. डी. पाठक, ग्रा. पं. सदस्य चंदू माळी, दशरथ धनगर, कैलास इंगळे, कॉन्ट्रॅक्टर संजय कुमावत , निसार देशमुख , माजी सरपंच अलीम देशमुख यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..