अखेर धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयाविरोधात गुन्हा दाखल, मंत्री महोदयांच्या अडचणी वाढणार

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला होता. याप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणावरुन धनंजय मुंडेंना घेरले जात असताना या व्हिडीओमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. अंजली दमानिया यांनी कैलास फड विरोधात पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे कैलास फडविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.कैलास फड याचा हा व्हिडिओ असून शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता. हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान याच कैलास फड याने मारहाण केल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर मंत्री धनंजय मुंडे हे देखील या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.दरम्यान बीडमधील संतोष देशमुखांच्या हत्येमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणामुळे बीडमधील कायदा, सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाचा मास्टर माईंड म्हणून वाल्मिक कराड आरोपाच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. तर कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. तर अंजली दमानिया मंगळवारी दुपारी एक ट्विट करत बीडमधील शस्त्रधारकांची यादीच समोर आणली होती. ‘बीडमध्ये पिस्तुलांचं थैमान? १२२२ शस्त्र परवानाधारक? इतक्या प्रचंड प्रमाणात शस्त्र परवाने का देण्यात आले? परभणीत ३२ आहेत तर अमरावती ग्रामीणमध्ये २४३ शस्त्र परवाने आहेत. मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर का व कोणाच्या वरदहस्ताने? १२२२ अधिकृत शस्त्र परवाने मग अनधिकृत किती असतील?,’ अशी प्रश्नांची सरबत्तीच दमानियांनी ट्विटच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर काहीच तासात केलेले अंजली दमानियांचे दुसरे ट्विट देखील चर्चेचा विषय ठरत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..