वडजाई वस्ती आव्हाळवाडी रोडवर असलेल्या बाईफ रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरावर पाहाटे आलेल्या अज्ञातंकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबारामध्ये घराच्या काचा फुटल्या असून यात सुदैवाने कोणीही जखमी नाही. पुणे तिथे काय उणे!? असं म्हटलं जाणाऱ्या पुण्यात गेल्या काही दिवसांत गुन्ह्याचं उणेपण वाढताना दिसत आहे. पुण्यासारख्या सुसंकृत शहरात गुंडांच आणि गुंडगिरीचं प्रस्थ वाढताना दिसत आहे. दरदिवशी पुण्यातून गुन्ह्याच्या वाढत्या घटना समोर येत आहेत. या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांसमोर नवी आव्हाने उभी केली आहेत. गुन्ह्याच्या वाढत्या प्रमाणावार अंकुश ठेवण्याचं काम जरी पोलिसांकडून होत असलं तरी, पोलिसांना चकमा देण्यात गुन्हेगार पटाईत झाल्याचं दिसत आहे. गुन्हे हे बहुधा रात्री किंवा पहाटे करण्यात येतात.
वडजाई वस्ती आव्हाळवाडी रोडवर असलेल्या बाईफ रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरावर पाहाटे आलेल्या अज्ञातंकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबारामध्ये घराच्या काचा फुटल्या असून यात सुदैवाने कोणीही जखमी नाही.










