अल्पवयीन मुलीची हत्या प्रकरण; आरोपी विशाल गवळीचा शोध सुरु, यापूर्वीही भररस्त्यात मुलीला पकडून मारहाण

मागील वर्षी याच आरोपीने कोळसेवाडी परिसरात या मुलीला गाठून भर रस्त्यात तिचा पाठलाग करत तिला पकडून पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता यावेळी या मुलीने प्रतिकार केल्यानंतर त्याने तिला मारहाण देखील केली होती. कल्याण पूर्व येथील १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. सदर मुलीला दुकानातून खाऊ घेऊन परतताना गवळी याने जबरदस्तीने उचलून रिक्षात घालून पळवून नेल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतले असून नराधम आरोपी विशाल गवळी फरार झाला आहे.दरम्यान, मागील वर्षी याच आरोपीने कोळसेवाडी परिसरात या मुलीला गाठून भर रस्त्यात तिचा पाठलाग करत तिला पकडून पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता यावेळी या मुलीने प्रतिकार केल्यानंतर त्याने तिला मारहाण देखील केली होती. मात्र यावेळी सुद्धा तिला सोडवण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते. आताही भर रस्त्यातून आरोपीने मुलीला उचलून नेताना अनेकांनी पाहिले मात्र कोणीही आरोपीच्या भीतीने पुढे आले नाही किंवा याची माहिती ही या मुलीच्या पालकांना कोणी दिली नाही असा आरोप या मुलीच्या आईने केला आहे.

सदर विनयभंग प्रकरणी आरोपीला अटक केल्यानंतरही त्याने पोलिसांबरोबर व्हिक्टरीचे चिन्ह दाखवत मुजोरी दाखवून दिली होती. सप्टेंबर महिन्यात न्यायालयाने या आरोपीची जामीनावर सुटका केल्यानंतर पुन्हा एकदा या आरोपीने या मुलीचे अपहरण करत तिच्याशी गैरकृत्य करून तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे आरोपी फरार असून या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी सहा पथके विविध ठिकाणी रवाना केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीने रिक्षाचालकाच्या मदतीने या मुलीचे अपहरण केल्याचे दिसत असून सदरच्या रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल असे कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले. दरम्यान, या आरोपीचे देखील बदलापूर प्रमाणेच एन्काऊंट केले जावे अशी मागणी संतापलेल्या नागरिकांकडून केली जात आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..