अंबरनाथमध्ये मनसेच्या शहर संघटकावर गोहत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरेंनी घेतलेली हिंदुत्त्ववादी भूमिका पाहता मनसे पक्षातूनही युसूफ शेखवर नाराजी असून त्याच्यावर आता काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अंबरनाथमध्ये मनसेच्या शहर संघटकावर गोहत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. युसूफ शेख असे त्याचे नाव असून धक्कादायक म्हणजे तो चक्क मनसेचा जुना झेंडा असलेल्या गाडीतून तो गोमांसाची वाहतूक करत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी युसूफ शेख याचा भाऊ जलालूद्दीन शेख यानेच अंबरनाथ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पुरावा म्हणून एका पेन ड्राईव्हमध्ये त्यांनी काही फोटो आणि व्हिडीओ पोलिसांना दिले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये युसूफ शेख हा एका खोलीत उभा असून त्याचे काही साथीदार गोहत्या करून गोमांस कापत असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत एका मोकळ्या जागेत गोवंशाच्या कत्तल करण्यात आली. या गोवंशांचं मांस एका फोर्ड इंडिव्हर गाडीत ठेवले जात असून ही गाडी युसूफ शेख याचीच आहे, असं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.










