तुमचाही ‘बीडमधील मस्साजोगचा सरपंच संतोष देशमुख करु’ अशी धमकी दोघांना पत्राद्वारे देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे माजी आरोग्यमंत्री, परांडा भूम विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे असलेले जिल्हा परिषद धाराशिवचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, तसेच धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक केशव सावंत यांना पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. तुमचाही ‘बीडमधील मस्साजोगचा सरपंच संतोष देशमुख करु’ अशी धमकी दोघांना पत्राद्वारे देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २२ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी मुळेवाडी पाटी येथे अज्ञात इसमाने तेरणा सहकारी साखर कारखाना येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालक गोपाळ प्रकाश आडे (राहणार पुसद) याकडे खाकी रंगाचे पॅकेट दिले. या पॅकेटमध्ये पांढऱ्या कागदावर पेन्सिलने धनंजय सावंत केशव सावंत यांना ‘मस्साजोग संतोष देशमुख करू’ असा मजकूर लिहिला होता. तसेच यामध्ये एक शंभराची नोट देखील होती.यापूर्वी देखील धनंजय सावंत यांच्या घरावर १३ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजता अज्ञाताने गोळीबार केला होता.










