बॉलिवूडचा लोकप्रिया पार्श्वगायक शान राहत असणाऱ्या वांद्रे, मुंबईतील निवासी इमारतीला मंगळवारी पहाटे आग लागली. गायक शान राहत असणाऱ्या मुंबईतील निवासी इमारतीला मंगळवारी पहाटे आग लागली. आगीचे वृत्त समोर येताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या आगीचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्याच धुराचे लोट स्पष्टपण दिसतायंत.मंगळवारी पहाटे वांद्रे पश्चिम परिसरात असणाऱ्या या फॉर्च्यून एन्क्लेव्ह या निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागली होती. साधारण १.५० वाजता पहाटे ही आगीची घटना घडली. याच इमारतीच्या अकराव्या मजल्यावर बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक शान वास्तव्यास आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा शान घरात उपस्थित होता की नाही, याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.










