राज्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याती नोंद आहे. यावर्षी २० डिसेंबरपर्यंत ३३५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या जिल्ह्यात झाल्या. दरवर्षी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा गाजत आला आहे . शेतकरी आत्महत्येला अनेक कारणे असली तरी यावर शासनाला अद्यापही ठोस पावले उचलता आली नाहीत. कुटुंबातील कर्ता जर मृत्यूला कवटाळत असेल तर त्याच्या कुटुंबीयांवर मोठा आघात होतो. वेळप्रसंगी कुटुंब आर्थिक संकटात सापडते. दरम्यान शासनातर्फे आत्महत्याग्रस्त कुटंबाला एक लाखाची आर्थिक मदत केली जाते. शिवसेना-भाजपा युती शासनाने आत्महत्याग्रस्त कुटुंबाला एक लाखाची मदत सुरू केली. मागील काही वर्षात महागाई प्रचंड वाढलेली आहे. पण शासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना देण्यात येत असलेल्या मदतीमध्ये वाढ झाली नाही. आजही शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना ३० हजार रोख व ७० हजार बँकेत ठेव अशी मदत करण्यात येत आहे. शेतकरी आत्महत्येला अनेक कारणे असली तरी यावर शासनाला अद्यापही ठोस पावले उचलता आली नाहीत. कुटुंबातील कर्ता जर मृत्यूला कवटाळत असेल तर त्याच्या कुटुंबीयांवर मोठा आघात होतो. वेळप्रसंगी कुटुंब आर्थिक संकटात सापडते. दरम्यान शासनातर्फे आत्महत्याग्रस्त कुटंबाला एक लाखाची आर्थिक मदत केली जाते. शिवसेना-भाजपा युती शासनाने आत्महत्याग्रस्त कुटुंबाला एक लाखाची मदत सुरू केली. मागील काही वर्षात महागाई प्रचंड वाढलेली आहे. पण शासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना देण्यात येत असलेल्या मदतीमध्ये वाढ झाली नाही. आजही शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना ३० हजार रोख व ७० हजार बँकेत ठेव अशी मदत करण्यात येत आहे. सततची नापिकी, मशागतीचा वाढलेला खर्च, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या व त्यातच वाढलेला कर्जाचा भार यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. राज्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याती नोंद आहे. यावर्षी २० डिसेंबरपर्यंत ३३५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या जिल्ह्यात झाल्या. दरवर्षी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा गाजत आला आहे . पण यावर्षी हिवाळी अधिवेशनात वाढत्या शेतकरी आत्महत्याबाबत चर्चाच झाली नाही.










