युद्धपातळीवर तपास करून तीन जणांना अटक केली आहे. त्यामुळे गोहत्या प्रकरणातील रॅकेट उघडकीस आले आहे. खेडमध्ये गोवंश हत्येचे काही पुरावे सापडल्यानंतर वातावरण तापलं होतं. सकल हिंदू संघटनाही रस्त्यावर उतरल्या होत्या. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनीही पोलिसांना कोणतही हयगय न करता तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी खेड येथे तातडीने भेट देत या प्रकरणात माहिती घेऊन तपासाचे आदेश दिले. यानंतर तिघा जणांना अटक करण्यात आली असून रॅकेट उघडकीस आले आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि पोलीस उपविभाग अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी युद्धपातळीवर तपास करून तीन जणांना अटक केली आहे. त्यामुळे गोहत्या प्रकरणातील रॅकेट उघडकीस आले आहे. चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी या प्रकरणातील तिघा जणांना अटक करण्यात आल्याचे सांगितले. त्यांच्याकडून मांस व एक जिवंत बैल हस्तगत करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच नागरिकांनी पोलिसांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.खेड तालुक्यातील देवणे पूल परिसरातील नारिंगी नदी पात्रात रविवार दि २२ रोजी गोवंशाचे अवशेष आढळल्यानंतर हे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. अशातच पुन्हा सोमवार दि २३ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास देवणे पुल येथेच नदी पात्रात गोवंशाचे अवशेष मिळाल्याने वातावरण तापले होते.










