चोरट्यांनी जाळल्याचा रचला बनाव, पोलिसांना CCTVमधून समजलं तरुणाबद्दलचं धक्कादायक सत्य;

नागपुरात एका तरुणाने जाळून अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्याने चोरट्यांनी त्याला जाळल्याचा बनाव रचला होता. सीसीटीव्हीमधून तरुणाबाबत सत्य पोलिसांसमोर आलं आहे. नेमकं काय घडलं? नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून जाळून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं उघड झालं आहे. मोटारसायकलवर आलेल्या चार युवकांनी त्या तरुणाचं अपरहण केलं. त्यानंतर त्याजवळील ६० हजार रुपये हिसकावून घेतल्याचं त्याने सांगितलं. चौकशीदरम्यान त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघडकीस आलं आहे. ही घटना कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी युवकाविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. चैतन्य केशव उके वय २० रा. शिवनगर, कांद्री, असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे.

२० डिसेंबर रोजी चैतन्य हा आंबेडकर चौकात उभा होता. यावेळी दोन मोटारसायकलवर चार जण आले. त्यांनी बळजबरीने मोटारसायकलवर बसवून त्या तरुणाला गाडेघाट नाल्याजवळील पुलाजवळ नेले. तेथे मारहाण करून त्याच्या जवळील ६० हजार रुपये हिसकावले. त्यानंतर अंगावर पेट्रोल टाकून जाळले आणि पसार झाले. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी लुटपाटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र चौकशीदरम्यान पोलिसांना अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केली असता, कन्हानमधील एका पेट्रोल पंपावरून तरुणाने पेट्रोल घेतलं. त्यानंतर त्याने जाळून घेतल्याचं समोर आलं. त्याने स्वत:चं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र लुटपाट करुन त्याला चार युवकांकडून जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा बनाव त्याने केला होता. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही पाहिल्यानंतर त्याची चौकशी केली. त्यात त्याने स्वत: पेट्रोल अंगावर ओतल्याचं दिसलं.सीसीटीव्हीद्वारे प्रकरण लक्षात आल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत त्याने माहिती दिली, की अज्ञात मोबाईलधारक सतत माझ्या मोबाईलवर संपर्क साधून पैशांची मागणी करत आहेत. ठार मारण्याची धमकी देत आहे. त्यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं चैतन्यने पोलिसांना सांगितलं.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..