सोलापुरात खुनाची एक भीषण घटना उघडकीस आली आहे. एका सालगड्याने आपल्या मालकाची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण सोलापुरात एकच खळबळ माजली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सालगड्याने शेत मालकाचा निर्घृण खून केला आहे. सोन्याच्या लोभासाठी सालगड्याने असे कृत्य केल्याचे पोलीस तपासात माहिती दिली आहे. कृष्णा नारायण चामे (वय ५२ वर्षे सध्या रा. यल्लमवाडी ता. मोहोळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सचिन भागवत गिरी (वय २५ वर्षे ता. सांगवी जि. धाराशिव ) असे सालगाड्याचे नाव आहे. मोहोळ पोलिसांनी कसोशीने तपास करत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. कृष्णा चामे यास सालगडी सचिन गिरी याने डोक्यात वारंवार हातोडा मारून प्रथम ठार मारले. त्यानंतर त्यांने धारधार हत्यारांने त्याचे शरीराचे तुकडे-तुकडे करून ते वेगवेगळया पॉलीकॅप कॅरीबॅगमध्ये भरून मयताचे शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरून ठेवले होते. मोहोळ पोलीस ठाण्यात १५ डिसेंबर २०२४ रोजी कृष्णा नारायण चामे (वय ५२ वर्षे) मोहोळ हा हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस ३ दिवस मिसींग व्यक्तीचा विविध ठिकाणी शोध घेत होते. तसेच मिसींग व्यक्तीची सर्व जिल्ह्यातील तसेच आसपासच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात तपास यादी पाठवून मिसींग व्यक्तीचे मोबाईलचा सीडीआर काढुन त्याचे अवलोकन करत होते.










