जयपूर अजमेर महामार्गावर एका भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याने 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सवाई मान सिंह रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार दिवसांमध्ये या महामार्गावर हा दुसरा मोठा अपघात असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजस्थानच्या जयपूर अजमेर महामार्गावर अजून एक मोठा अपघात झालाय. या आठवड्यातील हा दुसरा मोठा अपघात म्हणावा लागणार आहे. येथे एका भरधाव ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात 10 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, हा अपघात नेमका कसा झाला, याबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही. अपघाताची घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर जिल्ह्यातील चांदपोल ते बागरूला जाणाऱ्या जेसीटीएसएल बससोबत हा अपघात झालाय. ज्यावेळी ही अपघाताची घटना घडली, त्यावेळी बसमध्ये प्रवासी मोठ्या संख्येने होते. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना जवळच्या सवाई मान सिंह रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघातानंतर काही काळ मोठी वाहतूककोंडी झाली होती. अपघाताची माहिती कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.










