राजू याच्या मारहाणीमुळे सुनील गंभीर जखमी झाल्याचे बाब लक्षात येतच सुनीलची पत्नी माहेरी निघून गेली. हत्येची घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधीक्षक पूजा नागरे आणि अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले दारू पिऊन घरी आलेल्या पतीने पत्नीकडून जेवण मागितले. पत्नी दीड महिन्याच्या लेकराला स्तपान करत असताना थोडं थांबा असं सांगताच पतीने पत्नीला मारहाण सुरू केली. मोठा भाऊ वहिनीला बेदम मारहाण करत असताना लहान भावाने मोठ्या भावाला दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. ही घटना काल शुक्रवारी पहाटे कुंबेफळ येथे घडली. या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










