विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत हालचालींना अखेर वेग आला आहे. पक्षातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसमध्ये लवकरच राजीनामासत्र सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नितला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे खात्रीलायक सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले. तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदमुक्त होण्यासाठी दिल्लीत हायकमांडकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती पुढे आली आहे. चेन्नितला यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवल्यानंतर भाजपने आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून, त्यादृष्टीने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून पक्षाने पुढील महिन्यात १२ जानेवारीला शिर्डीत पक्षाचे प्रदेश अधिवेशन आयोजित केले आहे. राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा उद्या, रविवारी (दि. १५) नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. यामध्ये नाशिकमधून कोणाला संधी मिळते, याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून दादा भुसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांना संधी मिळणार असल्याचा दावा समर्थकांकडून केला जात आहे. दुसरीकडे भाजपमधून डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता आहे. नाशिककरांना मंत्रिपदाबाबत दिलेला शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळावा, अशी अपेक्षा भाजप पदाधिकाऱ्याकंडून व्यक्त केली जात आहे.परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीच्या अवमानाच्या घटनेनंतर तिसऱ्या दिवशी शुक्रवारी,१३ डिसेंबर रोजी परभणी शहरातील व्यवहार पूर्वपदावर आले. मात्र, शुक्रवारी सायंकाळी सामान्य रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करायला सुरूवात केली. या पार्श्वभूमीवर नागरिक, व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार सुरू ठेवावेत; कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सायंकाळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि प्रभारी पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार २०२१ मध्ये सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना एकेकाळी त्यांच्या वाहनाचे सारथ्य तृप्ती संजय मुळीक या महिला चालकाने केल्याने राज्यभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. मात्र आता याच महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. करणीच्या नावाखाली भोंदूबाबाच्या साथीने ८४ लाखांचा मुद्देमाल लुबाडल्याचा तिच्यावर आरोप आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील उदयनगर येथील दोघे सख्खे चुलत भाऊ आणि त्यांचा एक मित्र असे तिघेजण चिखली येथून घराकडे पल्सर दुचाकीने येत होते. अमडापूर गावातील चिखली मार्गावरील टिपू सुलतान चौकात अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरून धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल शुक्रवारी रोजी मध्यरात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास घडली.नागपुरात राहणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाचा गोव्यातील समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रणय विजय थूल असे मयत तरुणाचे नाव आहे. तो नागपूरच्या न्यू इंदिरा कॉलनी, भगवान नगर परिसरातील मूळ निवासी होता, मात्र सध्या नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्यास होता. काल, शुक्रवारी सकाळी गोवा येथील समुद्र किनाऱ्यावर बुडून प्रणयचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली.
टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. टी-२० फॉरमॅटमधील टीम इंडियाचा मुख्य खेळाडू असून आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाने त्याला ११ कोटींना आपला संघात कायम ठेवले होते. गडी करोडोंमध्ये पैसे कमवत असला तरी गावच्या मातीला काही विसरला नाही. करोडपती असलेल्या खेळाडूला कसलाही माज ना गर्व पाहायला मिळाला नाही, एकदम निवांत आनंद घेत त्याने आपल्या गावच्या घरातील चुलीजवळ बसून कडक चहाचा झुरके घेतला. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.१३ डिसेंबर रोजी पुष्पा-२ फेम अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. त्याला १४ दिवसांची न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली. पण नंतर रात्री उशीरा त्याला लगेच जामीन मिळाला. असे असतानाही त्यांना एक रात्र तुरुंगात काढावी लागली. ‘पुष्पा २- द रुल’ या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी तेलंगणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी अल्लू अर्जुनला चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्याय यात्रेच्या वेळी आपली पिगी बँक भेट देणाऱ्या चिमुकल्यांच्या आई-वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनोज आणि नेहा परमार असे मृत जोडप्याचे नाव आहे. मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील राहत्या घरी दाम्पत्याचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. ईडीच्या नोटिशीनंतर अधिकाऱ्यांनी केलेल्या धाकदपटशामुळे दोघांनी जीवनयात्रा संपवल्याचा आरोप आहे. घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून, त्यातील उल्लेखानुसार ईडी अधिकारी परमार दाम्पत्याला म्हणाले की ‘इतकी कलमं लावेन, की राहुल गांधी पंतप्रधान झाले, तरी ती हटवू शकणार नाहीत’