ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असताना नुकतेच पाचोरा शहरात ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडुन एका १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शहरातील भडगाव रोडवरील शक्तीधाम नजीक घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील राजीव गांधी काॅलनीत जितेंद्र गोसावी हे पत्नी, दोन मुले, वृद्ध आईसह वास्तव्यास आहेत. जितेंद्र गोसावी यांचा मोठा मुलगा रुद्र जितेंद्र गोसावी (वय १०) हा येथील कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयात इयत्ता तीसरीत शिक्षण घेत होता. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर रुद्र हा सायकल घेऊन शक्तीधामच्या दिशेने खेळण्यासाठी जात होता. तेवढ्यात समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरला बघुन रुद्रचा सायकलीवरील तोल गेल्याने रुद्र थेट ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडुन रुद्र याच्या डोक्याचा अक्षर:शा चेंदामेंदा झाला. सदरचा प्रकार रुद्र याच्या आई, वडिलांना कळताच त्यांनी एकच हंबरडा फोडत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरुन रुद्रचा मृतदेह मुकेश पाटील (पुनगाव) यांनी रुग्णवाहिकेतुन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात रुद्र याची वृद्ध आजीचा आक्रोश पाहुन उपस्थितांची डोळे पाणावले होते. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये जितेंद्र गोसावी यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक विजय उर्फ बबलु अशोक थोरात रा. पुनगाव ता. पाचोरा याचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे हे करीत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.